टॅंकरद्वारे पाण्यावर शुल्कावरून घोषणाबाजी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नागपूर - पाणी वितरणाचे जाळे नसलेल्या वस्त्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यावर शुल्क आकारण्याच्या उपविधीतील कलमाला विरोध करीत विरोधी पक्षाने महापौरांच्या आसनापुढे जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या शुल्काबाबत नागपूर एन्व्हायर्मेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एनईएसएल) बैठकीत पुनर्विचाराचा मध्यम मार्ग शोधला, परंतु, विरोधकांनी जोरदार विरोध करीत टॅंकरच्या पाण्यावरील शुल्क रद्द करण्याची मागणी लावून धरत "नही चलेगी, तानाशाही नही चलेगी' अशा घोषणा दिल्याने सभागृह अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आले. 

पाणी दर मूल्यांकन व वसुलीसंदर्भातील उपविधी यापूर्वीच महासभेने मंजूर केला आहे. यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. एकही सूचना किंवा हरकती न आल्याने ही उपविधी राज्य शासनाकडे पाठविण्याचा प्रस्ताव आज सभागृहात आला. या उपविधीतील कलम 60 नुसार पाणी वितरणाचे जाळे नसलेल्या भागांमध्ये टॅंकरचा खर्च न घेता केवळ पाण्यावर शुल्क वसुलीचा प्रस्ताव होता. लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत व्यवहार होणे योग्य नाही, त्यामुळे टॅंकरद्वारे पाण्याचे शुल्क घेण्याचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केली. टॅंकरद्वारे पाण्याचे शुल्काचा भार नागरिकांवर पडल्यास त्यांची होरपळ होईल, त्यामुळे हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी मांडली. यावर विरोधी बाकावरील सर्वच सदस्यांनी मागणी लावून धरली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या भागात पाणी कर घ्यावे, अशी भूमिका स्पष्ट केली. परंतु, याबाबत एनईएसएलच्या बैठकीत निर्णय घेऊ, त्यामुळे सभागृहात उपविधी राज्य शासनाकडे पाठविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी जोशी यांनी केली. यावर महापौर नंदा जिचकार सूचनेसह विषय मंजूर करताच विरोधक त्यांच्या आसनापुढे जाऊन घोषणाबाजी करू लागले. महापौरांनी गोंधळातच विषय मंजूर केले. विरोधकांची गोंधळ कायम असल्याने महापौरांनी अनिश्‍चित काळासाठी सभा स्थगित केली. 

Web Title: Shouted slogans from fees on water tanker