वॉटरकप स्पर्धेनिमित्त तलाठ्यांनी केले श्रमदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील काकोडा या गावामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त विदर्भ पटवारी संघाचे केंद्रिय अध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांच्या आवाहनानुसार बुलडाणा जिल्ह्यातील तलाठ्यांनी काल (ता.18) श्रमदानात सहभाग घेऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.

संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील काकोडा या गावामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त विदर्भ पटवारी संघाचे केंद्रिय अध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांच्या आवाहनानुसार बुलडाणा जिल्ह्यातील तलाठ्यांनी काल (ता.18) श्रमदानात सहभाग घेऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.

बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे, संग्रामपूरचे प्रभारी तहसिलदार समाधान राठोड, नायब तहसिलदार सचीन खंडाळे, यांनी सकाळी 7.00 वाजता गावात हजर राहून स्वत: श्रमदान करून गावकऱ्यांशी संवाद साधला. काकोडा गावच्या सरपंच पर्वणी मानखैर यांच्या पुढाकाराने वाटरकप स्पर्धेनिमित्त गावात आजवर झालेल्या कामाचे कौतुक निवासी उपजिल्हाधिकारी वराडे यांनी केले. यावेळी विदर्भ पटवारी संघ संग्रामपूरचे वतीने 21,000 रूपये धनादेश केंद्रिय अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या उपस्थितीत वराडे यांच्या हस्ते सरपंच मानखैर यांना सुपूर्द केला. यावेळी ग्रामसेवक कपले व काकोडा  गावचे ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ भारसाकळे, सचिव रमाकांत माकोने, उपाध्यक्ष विजयेंद्र धोंडगे, कोषाध्यक्ष जयंत हिंगे, सहसचिव राजेश राठोड यांचेसह  चिखली तालुक्यातून  संजय डुकरे, संतोष राठोड, भगवान पवार, नितीन काळे, विकास कस्तुरे, परशराम सोळंके, भुसारी, कटक, गिरी, केदार, गावंडे, डव्हळे, मंगलाताई सवडतकर मॅडम, इंदुताई शेजोळ मॅडम, देशमुख मॅडम, बाहेकर मॅडम, जोशी मॅडम, मेहकर तालुक्यातून विजय गारोळे, लक्ष्मण सानप, तानाजी वाठोरे, अजय शेवाळे, सुमेध तायडे, शेगाव तालुक्यातून विजय बोराखडे, तुळशीराम वानखेडे, सचिन ढोकणे, श्रीकांत हाके, खामगाव येथून सुधाकर गिरे, राहूल चौधरी, नितीन गायगोळ, विश्वनाथ उबरहडे, दिपक खोडके, आर एम राठोड, ए डी डिवरे, जि डी मांटे, आर. एम. नागे, एल आर झिंगरे़, ए के महाले, सुर्यकांत सातपुते,  के. एम. रत्नपारखी, आर एस चौधरी, एस. एस. मुर्हे, एम एच उमाळे, एस टी महाले,
 मोताळा तालुक्यातून देविदास लाड, अशोक झोटे, रामेश्वर इंगळे, जळगाव तालुक्यातून रुपेश एकडे, वाघ, सावंग, राखोंडे मंडळ अधिकारी तसेच संग्रामपूर तालुक्यातून विनोद भिसे, व्हि व्ही सुदेवाड, एस. एस. रंगदळ, व्ही. एम. करे, पि. व्ही. खेडकर, एस. ए. गाढे, अविनाश खरे, एस. बी. कांबळे मॅडम, ए. एन. वसू मॅडम, चिंचे मॅडम, मंडळ अधिकारी एम. डी. पवार, एस टी धमाळ, राऊत, उकर्डे या सर्वानी श्रमदान करून ढाळ बांधाची निर्मिती केली. 

आपल्या दैनंदिन शासकिय कामकाजातून सवड काढून सामाजिक बांधिलकी जोपासत दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी तन मन धनाने अहोरात्र झटणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यासोबत व गावकऱ्या सोबत श्रमदान करून एक वेगळेच समाधान लाभले असल्याची प्रतिक्रीया तलाठी बंधुमगिनींनी दिली. सर्वांनी गावकऱ्यांसोबत वनभोजनाचा आनंद सुध्दा घेतला. यावेळी संग्रामपूरचे तलाठी विनोद भिसे, सुदेवाड, रंगदळ, खेडकर, गाढे व त्यांचे सर्व सहकारी यांनी संपूर्ण नियोजन करून अथक मेहनत घेतली. त्याबद्दल जिल्हा कार्यकारणीच्यावतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Web Title: shramdaan performed at kakoda on the occasion of water cup competition by officers