श्रावणात पर्यटकांना खुणावतोय सातपुडा 

Waterfall
Waterfall

संग्रामपुर (बुलडाणा) - तालुक्याला लागुन असलेल्‍या सातपुड्याच्या पर्वतरांगा म्‍हणजे बुलडाणा जिल्‍ह्‍याला लाभलेले एक वदनाच आहे. त्‍यामुळेच या भागास मोठ्या प्रमाणात नैसर्गीक साधनसंपत्ती लाभली आहे. शिवाय अकोला ,अमरावती आणि मध्यप्रदेश यांच्या सिमेला लागुन असल्याने संग्रामपुर तालुक्याला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच सातपुड्याच्या कुशीतील निसर्गरम्य पर्यटनस्थळे विशेष आकर्षण केंद्र बनत चालली आहेत. गेल्‍या आठ दिवसापासून जिल्‍ह्‍यात सुरु असलेल्‍या पावसामुळे सातपुडा पर्वत रांगांमध्ये नदी , नाले, धबधबे मोठया प्रमाणात वाहत असून ते पर्यटकांना खुणावत आहे.

श्रावण महिना सुरु झाला की, या ठिकाणी सातपुड्याच्या कुशीत असलेल्‍या जटा शंकर धबधबा, मांगेरी महादेव, वानप्रकल्प(वारी हनुमान), या निसर्गरम्य पर्यटणस्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. महाराष्ट्र शासणाने ९ एप्रील १९९७ च्या आदेशान्वये अंबाबरवा वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. १२७ चौरस किलोमिटरच्या डोंगरांनी व्यापलेली हे क्षेत्र संरक्षीत झाल्याने येथील समृद्ध जैवविधता जपली आहे. त्‍यामुळे श्रावण सुरु झाला की, निसर्गाने मुक्‍तहस्‍ताने केलेली ही उधळण पाहण्याची पर्यटकांचे पाय आपोआप सातपुड्याकडे वळु लागतात.

ही आहेत पर्यटन स्‍थळे -
मांगेरी महादेव

संग्रामपुर तालुक्‍यात सोनाळा या गावापासुन पाच ते सहा किलोमीटर सातपुडा पर्वत रांगांमध्ये अंबाबरवा अभयारण्यात मांगेरी या ठिकाणी डाव्या बाजुला उंच असा दुर्गम डोंगर दिसतो यालाच मांगेरी महादेवाचा डोंगर असे नाव पडले आहे. सातपुड्याच्या हिरवागार पर्वतरांगेमध्ये बसलेले आणि नावाप्रमाणे महाशिखराचे विराजमाण झालेले महादेवाचे मंदीर या अभयारण्यातले एक आकर्षणाचे ठिकाण आहे. सहा हजार फुटापर्यत शिखराची चढाई अंगावर थरारा आणणारी आहे. 

जटा शंकर धबधबा
शेगाव वरुन ३५ किलोमीटर अंतरावर संग्रामपुर तालुक्‍यातील सातपुड्याच्या कुशीत पहाडाच्या मध्यभागी गुहेत महादेवाची मुर्ती आहे. त्यावरून धबधबा वाहत असल्यामुळे श्रावण महिन्यात दर सोमवारी भावीक, पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. श्रावण महिन्यात दर सोमवारी कावडधारी पाणी भरण्याकरीता कावड घेवुन याठिकाणी येत असतात.

वारीहनुमान (वानप्रकल्प)
शेगाव येथुन ५० किलोमीटर अंतरावर संग्रामपुर तालुक्याच्‍या सिमेवर मध्यप्रदेशातुन वाहत येणाऱ्या वान नदीवर वानप्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे आजुबाजुचा परिसर सुजलाम सुफलाम झाल्याचे दिसते. तसेच प्राचीन काळातील हनुमान मंदीर नदीच्या काठावर वसलेले असल्यामुळे हे ठिकाण वारी हनुमान म्हणुन प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. विशेष म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती या तिनही जिल्हाच्या सिमेवर वान धरण निर्माण झाला आहे. त्यामुळे तीनही जिल्हातुन पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com