विद्यापीठात होणार श्रीचक्रधर स्वामी अध्यासन केंद्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

विद्यापीठात होणार श्रीचक्रधर स्वामी अध्यासन केंद्र
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधर स्वामी अध्यासन केंद्र सुरू करण्याची फेब्रुवारी 2016 साली महानुभाव साहित्य संमेलनात केलेल्या मागणीवर विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या मागणीवर मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब केला असून, अध्यासनामुळे विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जानेवारी 2017 ला अधिसूचना काढण्यात आली होती. अध्यासनासाठी राज्य सरकारकडून दोन कोटींची तरतूद केली आहे. हा निधी विद्यापीठाला मिळताच सह ग्रंथालय, संशोधन केंद्रासह नवीन इमारत तयार होईल. त्यानंतर अभ्यासक्रम तयार केली जाईल. विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्रासह गुजरातमध्येही श्रीचक्रधर स्वामींचे बरेच मोठे कार्य आहे. त्यातूनच देशभरात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. यातूनच महानुभाव पंथाद्वारे त्यांच्या साहित्यावर अभ्यास आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने अध्यासन तयार करण्याची मागणी केली होती. ही मागणी आता पूर्ण होत असून, दोन कोटींचा निधी देण्यात येईल. हा पैसा राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये जमा करावा लागेल आणि त्यावरील व्याजातून अध्यासन चालविण्यात येईल असे कुलगुरू डॉ. काणे यांनी सांगितले.
प्राध्यापक, संशोधक सहायक नेमणार
अध्यासनासाठी विद्यापीठाकडून प्राध्यापक व संशोधक सहायक नेमले जाणार आहेत. संशोधना व्यतिरिक्त अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी विद्यापीठाची असेल. या निधीतून मिळणारा महसूल आणि वापर याची माहिती पुण्यातील उच्च शिक्षण संचालकांकडे सादर करावे लागणार असल्याचे डॉ. काणे यांनी सांगितले.

Web Title: Shri Chakradhar Swami Adhyasan Center will be in the university