श्री संत गजानन महाराज मंदिर 31 मार्चपर्यंत बंदच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या कलमांनुसार गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे मान्यतेने 31 मार्चपर्यंत बंद ठेवणेबाबत सूचित करण्यात आले आहे.

शेगाव (जि. बुलडाणा) : राज्यात कोरोना विषाणूपासून उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. शेगाव येथे ‘श्रीं’ च्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची दररोज मोठी गर्दी होत असते. याठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता दक्षता म्हणून श्री संत गजानन महाराज संस्थान येथील दर्शन सुविधा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहे.

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या कलमांनुसार गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे मान्यतेने 31 मार्चपर्यंत बंद ठेवणेबाबत सूचित करण्यात आले आहे. शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. त्यानुसार कोरेाना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराज संस्थान येथील दर्शन सुविधा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तसेच सर्व उत्सव व कार्यक्रमसुद्धा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेशसुद्धा देण्यात आले आहे.

सोशल मीडियावर पसरली होती अफवा
सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी बंद करण्याची अफवा हवेसारखी पसरली होती. याबाबत संस्थांनकडून मंदिर चालू राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले होते. परंतु, कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्या आदेशानुसार सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी श्री संत गजानन महाराज मंदिर बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केल्याने ‘श्रीं’ चे मंदिर भाविकांसाठी 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

दोन दिवसाआधी रामनवमी उत्सवही केला होता स्थगित
कोरोना व्हायरस या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून शेगाव येथील रामनवमीचा उत्सवही स्थगित करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले होते. या बैठकीला शेगाव संस्थानचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Sant Gajanan Maharaj temple is closed till 31st March