अमरावती शहरातील श्रीकृष्ण हवेली कोसळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

अमरावती : अमरावती शहरातील भाजीबाजार परिसरातील श्रीकृष्ण बाल लालाजी ट्रस्टच्या श्रीकृष्ण हवेलीची समोरील भिंत तर अंबागेट परिसरामधील जिरापुरे यांच्या इमारतीचा वरचा मजला गुरुवारी (ता.8) दुपारी पावसाच्या पाण्याने कोसळला. शंभर वर्षांहून अधिक काळ जुन्या या इमारतींचा उर्वरित शिकस्त भाग महापालिकेने पाडून संभाव्य धोका टाळला. अग्निशमन दल, अतिक्रमण निर्मूलन विभाग व आपत्ती निवारण कक्षाने ही कारवाई पूर्ण केली.

भाजी बाजार परिसरातील श्रीकृष्ण बाल लालाजी ट्रस्टची श्रीकृष्ण हवेली शिकस्त व अतिधोकादायक म्हणून जाहीर केली होती. ती पाडून टाकण्याची नोटीसही बजावण्यात आली होती, असे मनपाचे शहर अभियंता रवींद्र पवार यांनी सांगितले. मात्र, ट्रस्टने शिकस्त भाग पाडण्याची कारवाई वेळेत केली नाही. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अखेर या इमारतीच्या समोरचा क्षतिग्रस्त भाग कोसळला. या इमारतीत मेडिकल, किराणा दुकान व झेरॉक्‍सचे दुकान आहे. घटना घडली त्यावेळी ही सर्व प्रतिष्ठाणे बंद होती. त्यामुळे जीवितहानी सुदैवाने टळली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrikrushna building in Amravati city collapsed