कथ्थकच्या रंगात रंगला श्रीरंग

रोहित जंजाळे
रोहित जंजाळे

नागपूर: संत सोयराबाईंच्या "अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग' अभंगाला किशोरी आमोणकर यांच्या स्वरांचा साज चढलेल्या श्रीरंगाचे रूप अजरामर झाले आहे. कथ्थकचे प्रगत शिक्षण देणाऱ्या कार्यशाळेत गुरू पंडिता शमा भाटे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शास्त्रीय नृत्यविश्‍वात रंगलेला असाच एक श्रीरंग शहरात आला आहे. रोहित जंजाळे त्याचे नाव.
रंगभूमीवर महिलांना नृत्य करण्यास परवानगी नव्हती. त्या काळात कथ्थक नृत्याची साधना करणारे पुरुषच होते. मात्र, काळ बदलत गेला आणि लोकांचा या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कथ्थक म्हटले की, हे क्षेत्र मुलींचेच असल्याचा समज आहे. पण, या क्षेत्राकडे छंद म्हणून नव्हे, तर करिअर म्हणून बघण्याची गरज असल्याचे मत वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलेल्या रोहित जंजाळेने व्यक्‍त केले. कलाश्री आर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यशाळेच्या उद्‌घाटनानंतर तो "सकाळ'शी बोलत होता.
डॉ. सुमुखी अथनी यांच्याकडे शिक्षण घेतलेल्या रोहितकडे 40 विद्यार्थी कथ्थकचे प्रशिक्षण घेत आहेत. छंद म्हणून मी या क्षेत्रात आलो आणि इथलाच झालो असल्याचे रोहितने सांगितले. सध्या के. के. वा. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टमध्ये तो विद्यादान करतो. पुरुषांनी चमचम करणारा वेश घातला आणि मेकअप केले की, त्याच्याकडे बघणाऱ्या लोकांच्या नजरा बदलतात. कथ्थकमध्ये प्रावीण्य मिळवले की, पुरुषाची देहबोली बदलते. ते बघून पालक या क्षेत्रात करिअर करण्यास नकार देतात. मात्र, हा भ्रम चुकीचा आहे. या क्षेत्राकडे कल वाढण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे तो म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com