शुभम महाकाळकरचा भरचौकात खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नागपूर - शंकरनगर चौकातील एका बारमध्ये तोडफोड, शिवीगाळ तसेच बारमालकाला धक्काबुक्की करणे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांच्या चांगलेच अंगलट आले. बारमालकाने केलेल्या बेदम मारहाणीत आमदारपुत्रांचा मित्र शुभम सुनील महाकाळकर (वय 23, महाल, चिटणीस पार्क) याचा मृत्यू झाला. अंबाझरी पोलिसांनी बारमालक सावन ऊर्फ सनी प्रमोद बमब्रोतवार (वय 21, किराटपुरा, गांधी चौक) याच्यावर खुनाचा, तर अभिजित आणि रोहित खोपडे यांच्यासह एकूण आठ युवकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

लक्ष्मीभूवन चौकातील क्‍लाउड-7 बारमध्ये आमदार खोपडे यांची मुले अभिजित, रोहित व सात-आठ मित्र रविवारी रात्री गेले होते. यात शुभम आणि अक्षर खंडारे यांचाही समावेश होता. रात्री बाराच्या सुमारास बिलावरून त्यांचा बारमालक सनीशी वाद झाला. अभिजितने बार व्यवस्थापक सिद्धार्थ पाटील (रा. गिट्टीखदान) याला रागाच्या भरात लाथ मारली. त्यानंतर मित्रांनी बारमध्ये जबरदस्त तोडफोड केली. बारमालकानेही हॉकी स्टीक, काठ्या, रॉड आणि तलवारीने हल्ला चढविला. आरोपी सनीचा अवतार पाहून खोपडे आणि कंपनीने बारमधून पळ काढला. मात्र, सनीने त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. लक्ष्मीभूवन चौकात शुभम हा त्यांच्या तावडीत सापडला. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. सोबतच चाकूनेही हल्ला करण्यात आला. यात शुभमचा जागेवरच मृत्यू झाला.

आमदारपुत्रांवरही गुन्हे दाखल
आमदार कृष्णा खोपडे यांची दोन्ही मुले अभिजित आणि रोहित यांच्यासह आठ युवकांवर अंबाझरी पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. अभिजितने दारूची बाटली बारमालक सनीच्या डोक्‍यावर फोडली. यात तो गंभीर जखमी झाला. तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

युवतीच्या छेडखानीवरून वाद
बारमध्ये काही युवती दारू पीत होत्या. त्यांना इशारे करताना बारमालकाने हटकल्याने भांडणाला सुरुवात झाल्याचे कळते. सर्व दारू पिऊन असल्याने मालकाला धक्काबुक्की केली. बारमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढल्याने चांगलाच वाद उफाळल्याची माहिती बारमध्ये उपस्थित एका ग्राहकाने दिली.

Web Title: shubham mahakalkar murder