‘पापा, आर यू ओके?’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नागपूर - नागपुरात ‘झुंड’च्या शूटिंगला तब्बल ३५ दिवस पूर्ण झाले. अभिनयाचा महानायक अमिताभ बच्चन यांचे या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. नुकतेच दृश्‍य संपवून ते आरामखोलीत जात असताना दोनशे मीटरवरील किंग्ज वे हॉस्पिटलला आग लागल्याची घटना घडली. ही ब्रेकिंग न्यूज वृत्तवाहिन्यांवर झळकताच बिग बी यांची मुलगी श्‍वेता हिने फोन करून ‘पापा, आर यू ओके?’ अशी विचारणा केली. चित्रीकरणाच्या स्थळापासून काही दूर असून मी सुरक्षित असल्याचा निरोप त्यांनी मुलीला दिला.

येथील आठ मजली किंग्ज वे हॉस्पिटलच्या इमारतीला भीषण आग लागली असून, १५ जण अत्यवस्थ असल्याचे वृत्तातून सांगण्यात येत होते. यामुळेच नवी दिल्ली येथील घरी राहत असलेल्या श्‍वेताने वृत्तवाहिनीवरील बातम्या ऐकून फोन केला. विशेष असे की, संवाद साधत असताना जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे संदेश बिग बी यांना ती पाठवीत होती, अशातच बिग बींच्या शूटिंगच्या सेटजवळ भीषण आग लागल्याची बातमी तिने बघितली होती. बुधवारी पहिल्या दृश्‍याचे चित्रीकरण झाल्यानंतर आराम करण्यासाठी आले होते. 

सेटपासून अंतर असल्याचे कळविले. तसेच आगीच्या घटनेबद्दल काहीही माहिती नाही, असे बिग बी यांनी श्‍वेताला सांगितले.

बिग बी बाहेर आले...
आगीच्या घटनेची माहिती लेकीने कळविल्यानंतर मात्र बिग बी बाहेर आले. आग लागल्यानंतर आकाशात धुराचे लोट दिसले. सेटजवळून पाचशे मीटरवर आग लागल्याचे त्यांना सांगण्यात आले. ही आगीची घटना घडल्यानंतरही ठाऊक नसल्याचेही त्यांनी आपल्या ब्लॉगवर रात्री लिहिले.

Web Title: Shweta Call to Amitabh Bachchan Jhund Movie Shooting Fire