बससेवेसाठी आगारप्रमुखांना घेराव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

काटोल (जि.नागपूर)   ग्रामपंचायतने अनेकदा निवेदने देऊनही खैरी (चिखली) येथे बससेवा सुरू झाली नसल्याने संतप्त नागरिकांनी सलील देशमुख यांच्या नेतृत्त्वात अधिकाऱ्यांना घेराव घातला. यामुळे काहीकाळ पंचायत समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

खैरी येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कोंढाळी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु, वेळेवर बस येत नसल्याने आणि आलेल्या बसमध्ये जागाच राहत नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. बससेवा सुरू करावी असा ठराव घेऊन ग्रामपंचायतीने मागणीसाठी पत्रव्यवहार केला. मात्र, यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दोन दिवसांपूर्वी या भागाचा दौरा करताना नागरिकांनी सलील देशमुख यांना या मागणीबद्दल माहिती दिली. त्यानुसार आज मंगळवारी काटोल पंचायतीवर धडक दिली. सहायक खंडविकास अधिकारी धापके यांची भेट घेतल्यावर काटोल आगार व्यवस्थापकांना तातडीने पंचायत समीतीमध्ये बोलाविण्यात आले. आगार व्यवस्थापक रंगारी पंचायत समितीमध्ये आल्यावर मानव विकास योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या बसेस केवळ विद्यार्थ्यांसाठी वापरण्यासाठी उपयोग झाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका घेतली. यावर सोमवारपर्यंत तोडगा काढण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले. बससेवा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siege of Departments for bus service