esakal | पट्टेवाटपासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव
sakal

बोलून बातमी शोधा

 काटोल ः उमठावासींच्या मालकी हक्‍काच्या पट्ट्यांच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सलील देशमुख.

पट्टेवाटपासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काटोल (जि.नागपूर) :  नरखेड तालुक्‍यातील उमठा येथील नागरिक वर्षानुवर्षे गावातच वास्तव करीत आहेत. परंतु, त्यांच्या नावाने मालकी पट्टे नसल्याने कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. यामुळे गावातील 102 नागरिकांना त्यांच्या नावाने मालकी पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी युवा नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्वात उमठावासींनी उपविभागीय अधिकारी उंभरकर यांना घेराव करून निवेदन दिले. 
उमठा येथील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 102 दोन कुटुंबे ही महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहतात. अतिक्रमण नियमानुसार या 102 दोन कुटुंबांना पट्टेवाटप करण्यात यावे, यासाठी अनेक दिवसांची मागणी होत आहे. यासाठीचा लागणार प्रस्ताव पंचायत समिती नरखेड यांच्यामार्फत ऑनलाइन तयार करण्यात आला आहे. परंतु, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून यावर कारवाई होणे बाकी आहे. वरील 102 अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे मिळावे, यासाठी ग्रामपंचायत उमठाने डिसेंबर 2018 ला ग्रामसभेचा ठरावसुद्धा घेतला असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली. या गंभीर बाबीवर प्रशासनाने तातडीने उपयोजना करणे गरजेचे होते. परंतु, आपसातील समन्वय योग्य पद्धतीने नसल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. यावर पंचायत समिती नरखेड व उपविभागीय कार्यालयाची संयुक्त बैठक लवकरच लावण्याची मागणी सलील देशमुख यांनी केली. यावर उपविभागीय अधिकारी उंभरकर यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून माहिती घेतली. तसेच यासंदर्भात लवकरच संयुक्त बैठक लावण्यात येईल, असे आश्‍वासनसुद्धा उंभरकर यांनी उपस्थितांना दिले. सलील देशमुख यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश रेवतकर, उमठाचे उपसरपंच प्रवीण दरेकर, भाऊसाहेब पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

loading image
go to top