"सिग्नल जम्पर्स'ची विक्रमी कामगिरी, 10हजार जणांनी तोडले सिग्नल 

अनिल कांबळे
शनिवार, 28 जुलै 2018

नागपूर - नागपूरच्या बहाद्दरांनी "सिग्नल जम्पिंग'चा विक्रम केला आहे. सहा महिन्यात 10 हजार जम्पर्सनी सिग्नल तोडले असून त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांनी सुमारे पावणे सतरा लाखांचा दंड वसूल केली आहे. हा आकडा फक्त पोलिसांच्या नजरेत आलेल्यांचा आहे. विक्रमवीर जम्पर्सची संख्या यापेक्षा दहापट जास्त आहे. 

नागपूर - नागपूरच्या बहाद्दरांनी "सिग्नल जम्पिंग'चा विक्रम केला आहे. सहा महिन्यात 10 हजार जम्पर्सनी सिग्नल तोडले असून त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांनी सुमारे पावणे सतरा लाखांचा दंड वसूल केली आहे. हा आकडा फक्त पोलिसांच्या नजरेत आलेल्यांचा आहे. विक्रमवीर जम्पर्सची संख्या यापेक्षा दहापट जास्त आहे. 

लाल दिवा लागल्यास सिग्नलवर थांबावे लागते हे अनेकांना अद्यापही पचनी पडलेले नाही. चौकात पोलिस उभे असतानाही त्यांच्या डोळ्यादेखत सुसाट गाडी पळविणे काहींना अभिमानास्पद वाटते. काधीकाळी कारवाई होत असल्याने जम्पर्सची हिंमत चांगलीच वाढली आहे. यास कोपऱ्यात उभे राहणारे वाहतूक पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत. सिग्नल तोडू नये यापेक्षा सिग्नल तोडणाऱ्यांवरच त्यांचे लक्ष अधिक असते. सक्ती केली आणि दंड ठोठवल्यास हे हेल्मेटवरून सिद्ध झाले आहे. आज भीतीने म्हणा किंवा नालाईजाने अंशी टक्के वाहनचालक हेल्मेट घालूनच घरून निघतो. यामुळे जम्पर्सना रोखणे अवघड नाही. फक्त वाहतूक पोलिसांनी "कोपरा' सोडून मनावर घेण्याची गरज आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, शहरात जानेवारी ते जुलै 2018 पर्यंत 10 हजार पेक्षा जास्त वाहनचालकांना सिग्नल तोडल्याने दंड ठोठावला आहे. दंडापोटी पोलिसांनी 16 लाख 50 हजार रुपये जमा केले आहेत. 

4 हजार वाहनचालक मोबाईलवर 
दुचाकी किंवा वाहन चालवित असताना मोबाईल बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जानेवारी ते जून 2018 पर्यंत 4 हजार वाहनचालकांवर कारवाई केली आहे. तब्बल 7 लाख रूपयांचा दंड वाहनचालकांडून वसूल केला आहे. अनेक मुली मोबाईलवर कानात हेडफोन घालून वाहन चालवितात. त्यामुळे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये मुलींचे मोठा वाटा आहे. 

मद्यपींकडून सव्वा दोन कोटींचा दंड 
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या जास्त आहेत. गेल्या सहा महिन्यात 10 हजार 205 मद्यपी वाहनचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 30 लाखांचा दंड वसुल केला. मात्र, शहरात नेहमीच्या जागेवर नाकेबंदी लागत असल्यामुळे मद्यपी वाहनचालक रस्ता बदलून जातात. 

आकडे बोलतात... 
सिग्नल जम्पींग- 10,112 (दंड-16 लाख 40 हजार) 
मोबाईलवर बोलणे - 4, 124 (दंड-7 लाख 6 हजार) 
हेल्मेट - 21, 087 (दंड - 76 लाख 33 हजार) 
सिटबेल्ट - 4,098 (दंड -8 लाख) 
ट्रिपल सिट - 3679 (दंड -6 लाख 24 हजार)
 

Web Title: Signal Jumper's Record, 10 thousand Signed