पती-पत्नीचा एकाचवेळी मृत्यू

file photo
file photo

पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पिंपळखुटा येथील दांपत्याचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. हनवंता विश्‍वंभर वाघमारे (वय 55), सुशीला हनवंता वाघमारे (वय 50) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही तालुक्‍यातील पिंपळखुटा येथे राहतात.
सुशीलाच्या नावे असलेल्या येरंडा शिवारात हनवता याने शनिवारी (ता. 17) सकाळी झाडाला गळफूान काही अंतरावरच पत्नी सुशीला हिचाही मृतदेह आढळून आला. मृत दांपत्यांचा मुलगा प्रमोद हा शहरातून रात्री घरी गेला. त्याला घर बंद दिसल्यामुळे त्याने काही शेजारच्या नागरिकांच्या मदतीने आई-वडील कुठे गेले याचा शोध घेतला. मात्र येरंडा शिवारात दोघांचेही मृतदेह आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिस पुढील तपास करणार आहेत.
घटनेची माहिती मिळताच रात्रीलाच पोलिस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृत दांपत्यांच्या पश्‍चात एक विवाहित मुलगी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. कौटुंबिक कलहातून हा प्रकार झाला असल्याची चर्चा गावात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com