फसवणूक सरकारकडून सिंदखेडराजाचीही फसवणूक- सुप्रिया सुळे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

सवणूक सरकारकडून सिंदखेडराजाचीही फसवणूक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

बुलढाणा- फसवणूक सरकारकडून सिंदखेडराजाचीही फसवणूक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

राज्यात फसवणूक सरकारने जनतेची संपूर्णपणे दिशाभूल करुण फसवणूक केली आहे. तसेच, सिंदखेराजा विकास आराखड्याविषयी बोलताना मूख्यमंत्र्यांनी येऊन घोषणा केली होती की, 350 कोटी रुपयांचा हा विकास आराखडा आहे तो पूर्णत्वाकडे नेण्यास सरकार कटीबद्ध राहिल असे आश्वासन दिले होते मात्र त्यांनी फक्त फसवणूकच केली आहे.

आमचे सरकार जेव्हा सत्तेत येईल तेव्हाच जिजाऊ जन्म सिंदखेडराजाचा विकास आराखडा पूर्ण होईल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे जिजाऊ भक्तांची प्रचंड गर्दी झाली असून जिजाऊच्या दर्शनासाठी देशभरातील जिजाऊ भक्त लाखोच्या समुदाय जमला आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुळे यांनी सिंदखेडराजा राजवाड़ा येथे येऊन जिजाऊचे दर्शन घेतले त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांना भेटण्याठी युवकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Web Title: Sindkhedaraja fraud by the State government