सावत्र आईच्या छळामुळे बहीणभावाचे पलायन

सावत्र आईच्या छळामुळे बहीणभावाचे पलायन

नागपूर - सावत्र आईच्या छळाला कंटाळून पाचपावली हद्दीत राहणाऱ्या बहीणभावाने घरातून पलायन केल्याची घटना उघडकीस आली. तपासात मात्र दोन्ही मुले आपल्या आईसोबत निघून गेल्याचे निष्पन्न झाले. साक्षी (१२) आणि यश  (१०) दोन्ही रा. महर्षी दयानंदनगर अशी या बहीणभावाची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षीचे वडील खासगी काम करतात. त्यांना सावत्र आई आहे. मुलांच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर नेहमीच्या कटकटीला कंटाळून मुलाची आई दोन्ही मुलांना वडिलांकडे सोडून घरातून निघून गेली होती. त्यानंतर सावत्र आईने त्यांचा छळ सुरू केला होता. त्यामुळे मुले कंटाळली होती. परंतु, त्यांच्याकडे पर्याय नव्हता. १८ जानेवारी रोजी शाळेत जाते असे सांगून साक्षी घरातून निघाली. त्याचप्रमाणे मित्राकडे जाऊन येतो, असे सांगून यशदेखील घरातून निघाला. त्यानंतर दोघेही घरी आलेच नाही. 

बराच वेळ झाली तरी मुले घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास केला असता मुलांच्या वडिलांना दोन बायका असल्याची माहिती समजली.  सावत्र आईच्या जाचामुळे मुले निघून गेली असावीत, अशीही माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे पोलिसांनी मुलांच्या आईचा मोबाईल क्रमांक घेतला. पोलिसांनी आईच्या मोबाईलवर संपर्क केला असता दोन्ही मुले माझ्यासोबत असून ते सुरक्षित असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस बुचकळ्यात पडले. मुलांच्या आईने पोलिसांना असेही सांगितले की, १८ तारखेला ती नागपूरला आली. ठरल्याप्रमाणे दोन्ही मुले आपल्या घरातून निघाले. मुलांना घेऊन आई थेट रेल्वेस्थानकावर गेली. गुजरातला जाणारी गाडी स्थानकावर उभीच होती. गाडीत बसून ती मुलांना घेऊन गुजरातला गेल्याचे पुढे तिने सांगितले. पोलिसांनी मुलांच्या आईची समजूत काढल्यानंतर एकदोन दिवसात मुलांना घेऊन नागपूरला येणार असल्याचे पुढे तिने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com