राखीचा धागा ठरला अखेरचा!

shakuntala thakare
shakuntala thakare

नेर (यवतमाळ) : देहात प्राण असेपर्यंत रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्याचे वचन तिने पूर्ण केले. ओवाळणी घालून भावाच्या मनगटावर राखी बांधली. भावाच्या सुखाची कामना केली. मात्र, तिने बांधलेला तो प्रेमाचा धागा अखेरचा ठरला. राखी बांधणार्‍या बहिणीचाच ’स्क्रब-टायफस’ने बळी घेतला. शंकुतला जगन्नाथ ठाकरे (वय 70, रा. माळीपुरा नेर) असे त्या बहिणीचे नाव आहे.

येथील माळीपुर्‍यातील रहिवासी शंकुतला ठाकरे यांचा ’स्क्रब टायफस’ने सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (ता. 8) मृत्यू झाला. त्यांचा भाऊ आर्णी तालुक्यातील जवळा येथे राहतो. भावाला ओवाळण्यासाठी त्या तेथे गेल्या होत्या. भावाला राखी बांधली. भावाकडे पाहुणचारही झाला. तेथेच तिला ’स्क्रब टायफस’ ज्यामुळे होतो त्या किड्याने डंख मारला. भावाने त्यांना रुग्णालयात नेले परंतु, ताप कमी झाला नाही. त्यांची प्रकृती खालावत गेली. शेवटी डॉक्टरांनी त्यांना सेवाग्राम येथे नेण्याचा सल्ला दिला. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्यावर रविवारी (ता. 9) येथील मोक्षधामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

’स्क्रब टायफस’चा जिल्ह्यात दुसरा बळी 
’स्क्रब टायफस’ या आजाराची ओळख येथील हिराचंद मुणोत क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक व ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी करून दिली. त्यानंतर जिल्ह्यात 26 रुग्ण आढळले. आतापर्यंत वणी व नेर तालुक्यातील दोन वृद्ध महिलांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com