प्रेमविवाहाबद्दल बहिणीचे भावानेच केले अपहरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

भंडारा - कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय परस्पर प्रेमविवाह करणाऱ्या मुलीचे तिच्या भावानेच अपहरण केल्याची घटना शहरात घडली. पीडित युवती येथील महाविद्यालयात शिकत असून, तिने एका युवकासोबत प्रेमविवाह केला. त्यासाठी तिच्या घरच्या मंडळीचा विरोध होता. ही मुलगी महाविद्यालयात पेपर देण्यास आली होती. नागपूर येथे राहत असलेला तिचा मोठा भाऊ अन्य एकासोबत आला. मुलीचा पेपर संपल्यावर त्याने कॉलेज परिसरात तिच्या पतीला मारहाण करून मुलीला जबरदस्तीने आपल्या सोबत नेले. मुलीच्या पतीने या घटनेची तक्रार भंडारा पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी मुलीचे अपहरण करून धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
Web Title: sister kidnapped by brother