सख्ख्या भावाचा बहिणीवर बलात्कार

Rape
Rape

नागपूर - बारावीत शिक्षण घेत असलेल्या सख्ख्या भावाने १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार केला. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

हुडकेश्‍वरमध्ये राहणारे दाम्पत्य गवंडी काम करतात. हातावर कमावणे आणि पानावर खाणे, अशी घरात स्थिती. त्यांचा मोठा मुलगा शंकर (बदललेले नाव) बारावीत तर मुलगी प्रांजू (बललेले नाव) ११ वीत शिकते. मुलांच्या शिक्षणासाठी आईवडील राब राब करीत असताना मुलाने मात्र वेगळाच प्रताप केला. ऑक्‍टोबर महिन्यात आईवडील कामावर गेले असताना प्रांजू शाळेतून आली होती. त्यावेळी शंकर हा मोबाईलवर अश्‍लील चित्रफिती बघत होता. त्यावेळी त्याने प्रांजूवर बळजबरी करीत बलात्कार केला. तिने विरोध करीत आईवडिलाला सांगण्याची धमकी दिली. त्याने घरातील चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती गप्प होती. तेव्हापासून तो आईवडील कामावर गेल्यानंतर बहिणीवर अत्याचार करीत होता. यादरम्यान ती गर्भवती झाली. हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

भावाविरुद्ध गुन्‍हा दाखल
पोट दुखत असल्याची तक्रार प्रांजूने आईकडे केली. त्यामुळे तिला डॉक्‍टरांकडे नेण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासणी केली असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. दवाखान्यात प्रांजूला मारहाण करण्यात आली. तिने मोठ्या भावाचे नाव घेतल्यानंतर आईची पायाखालची जमीन सरकली. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com