नागपूर-भंडारा मार्गावर भीषण अपघात, लग्नाच्या व-हाडातील सहा ठार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नागपूरच्या उदय नगर भागातील अमित झिलपे यांचे शुक्रवारी सायंकाळी तिरोडा (जि. गोंदिया) येथे लग्न होते. लग्नकार्य आटोपून व-हाड रात्री तीन वाजता तिरोड्यावरून नागपूरच्या दिशेने निघाले. दरम्यान, भंडारा ओलांडल्यानंतर सिंगोरीनजिक एक नादुरूस्त कंटेनर महामार्ग क्रमांक सहाच्या शेजारी ऊभा होता. सकाळी सहा वाजेदरम्यान व-हाड्यांच्या बसच्या चालकाला डुलकी आल्याने सदर बस कंटेनरवर जोरात धडकली.

नागपूर : नागपूर-भंडारा मार्गावर शनिवारी (ता. १५) पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाले आहेत. व-हाड्यांना घेऊन नागपूरकडे परत जाणारी खासगी बस महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूरच्या उदय नगर भागातील अमित झिलपे यांचे शुक्रवारी सायंकाळी तिरोडा (जि. गोंदिया) येथे लग्न होते. लग्नकार्य आटोपून व-हाड रात्री तीन वाजता तिरोड्यावरून नागपूरच्या दिशेने निघाले. दरम्यान, भंडारा ओलांडल्यानंतर सिंगोरीनजिक एक नादुरूस्त कंटेनर महामार्ग क्रमांक सहाच्या शेजारी ऊभा होता. सकाळी सहा वाजेदरम्यान व-हाड्यांच्या बसच्या चालकाला डुलकी आल्याने सदर बस कंटेनरवर जोरात धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की व-हाड्यांपैकी तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला. 

त्या घरात आंबटशौकिनांची असायची ये-जा; पोलिसांनी टाकला छापा अन्‌... 
 

Image may contain: outdoor

 

 

Image may contain: outdoor, text that says 'ARNAV'

 

मृतांमध्ये नवरदेवाच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये नवरदेवाची आजी विठाबाई झिलपे (वय ७२ रा. नागपूर), बहीण जावई सतीश जांभूळकर (वय ३६ रा. तिरोडा), आत्या करुणा विजय खोंडे (वय ५५, रा. नागपूर), मामेभाऊ आनंद आठवले ( वय २८ रा. नागपूर), बसचा वाहक व अन्य एका नातेवाईकाचा समावेश आहे. या अपघातातील जखमींवर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवरदेव अमित झिलपे नागपूरच्या पोलिस मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत. झिलपे यांचा विवाह शुक्रवारी तिरोडा येथे कमल चौरे यांच्या मुलीशी पार पडला. सर्व लग्नकार्य आटोपून नागपूरला परत येत असताना ही घटना घडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six died in major accident on nagpur bhandara road