राज्यातील सहा तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट ; 99 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता

विवेक मेतकर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

अकोला : राज्यातील सहा तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असून त्यांच्या विकासकामांसाठी शासनाने ९९ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आहे. या विकास आराखड्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून, मजूर निधी घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा यावर जास्तीत जास्त खर्च करण्याचे निर्देश आहेत

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत टाकळघाट (नागपूर), कपीलधार (बीड), श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर (जालना), आमला (अमरावती), श्रीक्षेत्र कोंडेश्वर (अमरावती), संत गाडगे महाराज जन्मभूमी (शेंडगाव, जि. अमरावती) या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी देतानाच सिंधुदुर्ग येथे बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक तसेच हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे स्मारक उभारण्यास तत्वत: मंजुरी दिली.

स्वच्छतेवर भरविकास आराखडा तयार करताना घनकचरा व्यवस्थापनाचा त्यात समावेश आवर्जून असावा. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देऊन त्याचे पावित्र्य राखण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कामांचा समावेश या तीर्थक्षेत्र विकासांच्या कामांमध्ये रस्ता, भिंत, सुशोभीकरण, भक्तनिवास, पाणीपुरवठा, अन्नछत्र सभागृह, संरक्षक भिंत, स्वच्छतागृहे, सभामंडप सजावट आदी कामांचा समावेश आहे.

तीर्थक्षेत्र - 

श्रीक्षेत्र विक्तुबाबा देवस्थान, टाकळघाट, जि. नागपूर (५ कोटी)
श्रीक्षेत्र कपीलधार, जि. बीड (१० कोटी)
श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर, राजूर, जि. जालना (२४.९८ कोटी)
श्रीसंत गाडगे महाराजांची कर्मभूमी असलेले आमला व ऋणमोचन, जि. अमरावती (१०.२० कोटी)
श्रीक्षेत्र कोंडेश्वर, जि. अमरावती (२५ कोटी)
संत गाडगे महाराजांची जन्मभूमी, शेंडगाव, जि. अमरावती (१८.७० कोटी)
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक, सिंधुदुर्ग (४.५५ कोटी)

Web Title: Six holy places will be transformed in the state The development plan of 99 crores is Sanctioned