अमरावती जिल्हा हादरला! तब्बल सहा ठिकाणी घडल्या हाणामारीच्या घटना.. काय होते कारण वाचाच 

संतोष ताकपिरे 
Friday, 7 August 2020

ग्रामिण भागात सहा ठिकाणी क्षुल्लक कारणावरून वाद होऊन मारामारीच्या घटना घडल्या. त्यात आठ जण जखमी झाले. एकाठिकाणी नाश्‍ता दिला म्हणून तर, दुसऱ्या ठिकाणी महिलेला कुत्रा चावल्याने दोन गट समोरासमोर भिडले.

अमरावती: आजकाल लोकांचे भांडण कुठल्या थराला जाईल काहीही सांगता येत नाही. या भांडणांचे रूपांतर हाणामाऱ्यांमध्ये किंवा गुन्ह्यांमध्ये होण्यास वेळ लागत नाही. अशाच काही घटना अमरावती जिल्ह्यत घडल्या आहेत.  

ग्रामिण भागात सहा ठिकाणी क्षुल्लक कारणावरून वाद होऊन मारामारीच्या घटना घडल्या. त्यात आठ जण जखमी झाले. एकाठिकाणी नाश्‍ता दिला म्हणून तर, दुसऱ्या ठिकाणी महिलेला कुत्रा चावल्याने दोन गट समोरासमोर भिडले.

जाणून घ्या - नोकराचा आला मालकिणीवर जीव; फोटोशूट करून केली भलतीच मागणी, आता...

नाश्‍ता का दिला

चांदुररेल्वे परिसरात संजय रामदास तांडेकर (वय 30) सोबत किसन खडसे याला नाश्‍ता का दिला यावरून शेख जफर शेख हसन (वय 27) याने भांडण केले. काठीने मारहाण केली. त्यात तांडेकर जखमी झाले. 

कुत्रा सुनेला चावला

मारामारीची दुसरी घटना चिखलदरा तालुक्‍याच्या रामटेक येथे घडली. एकमेकांचे शेजारी असलेल्या सुरेश छोटेलाल जामकर (वय 52) यांच्या वडिलांनी सुनील रामु बेलसरे याचा कुत्रा सुनेला चावला, यावरून वाद घातला. लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. जखमीचा मुलगा सुरेश यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी बेलसरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 दुसरा पाळणा बांधण्याचे कारण

धारणी तालुक्‍यात गोलाई येथे एकाच ठिकाणी दुसरा पाळणा बांधण्याच्या कारणावरून अयोध्या बालाजी नागरगोजी यांच्याशी सूर्यभान रघुनाथ नागरगोजी यांनी वाद घातला. घराच्या कंपाउंडची काठी उपटून मारहाण केली. त्यात महिला जखमी झाली. जखमीच्या तक्रारीवरून सुर्यभानविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

चावा घेऊन केले जखमी

धारणीतील काटकुंभ येथे राघू कालू डुंडवा (वय 27) सोबत सिद्धार्थ गप्या डावरे याने वाद घातला. सिद्धार्थने रघू यास चावा घेऊन जखमी केले. जखमीचे तक्रारीवरून डावरेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

कसं काय बुवा? - घरच्या कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक रडत होते ढसा ढसा, डॉक्टरांनी दिली रुग्ण जिवंत असल्याची बातमी, वाचा संपूर्ण प्रकार...

उधार दिलेले पैसे मागितले

शेंदुरजनाघाट हद्दीत पुसला गावात दिलीप जिरापुरे याने उधार दिलेले पैसे मागितले असता, त्यांच्यासोबत रामकिसन उर्फ गोविंदा याने वाद घातला. विळ्याने हल्ला केला. त्यात दिलीप जिरापुरे जखमी झाले. जखमीचा पुतण्या राजेश बाबाराव जिरापुरे यांच्या तक्रारीवरून शेंदुरजनाघाट पोलिसांनी रामकिसन विरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाद घालून मारहाण 

मंगरुळदस्तगीर हद्दीत रघूनाथपुर येथे नंदा पांडुरंग रेवाळे (वय 50) यांच्या मुलासोबत राहुल माणिकराव ठाकरे यानी वाद घालून मारहाण केली. त्यात महिलेचा मुलगा जखमी झाला. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six incidents of big fights recorded in Amravati