देवदर्शनाला जाताना झालेल्या अपघातात चालकासह एकाच कुटंबातील 6 जण ठार

देवदर्शनाला जाताना झालेल्या अपघातात चालकासह एकाच कुटंबातील 6 जण ठार

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये स्विफ्ट मोटारीला भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुंटुंबातील 06 जणांचे अपघाती निधन झाले आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांचा तर मोटार चालकाचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

आनंद देशमुख यांचे कुटुंब देवदर्शनासाठी गेलं होतं. त्यावेळी बंगळुरूमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात संपूर्ण कुटुंब ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज(ता.06) सोमवारी सकाळच्या सुमारास देशमुख कुटुंबाच्या मोटारीची एका टँकरला धडक झाली. या अपघातात 3 पुरुष, 2 महिला आणि 2 चिमुकल्यांचा समावेश आहे.

समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरला कारची जोरात धडक झाल्याने या अपघातात कोणीही बचावलं नाही. तर हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी कार कापावी लागली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com