परिषदेच्या नवनिर्वाचित सहा सदस्यांचा शपथविधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नागपूर - महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी संस्थेद्वारा निर्वाचित नवनियुक्त सहा सदस्यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी शपथ दिली.

नागपूर - महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी संस्थेद्वारा निर्वाचित नवनियुक्त सहा सदस्यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी शपथ दिली.

शपथ घेतलेले नवनिर्वाचित सदस्यांमध्ये अनिल शिवाजीराव भोसले (पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था) अमरनाथ अनंतराव राजूरकर (नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था), मोहनराव श्रीपती कदम (सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी संस्था), चंदूभाई विश्रामभाई पटेल (जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था), डॉ. परिणय रमेश फुके (भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था), तानाजी जयवंत सावंत (यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था) यांचा समावेश होता. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य, नवनिर्वाचित सदस्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

अनिल भोसले आणि अमरनाथ राजूरकर पुन्हा एकदा निवडून आले आहेत. चार सदस्य नव्याने निवडून आलेले आहेत.

Web Title: Six members of the swearing-in of the newly elected Council