वाघाच्या मृत्यूप्रकरणात आणखी सहा जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) - शेतपिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांच्या स्पर्शाने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 4) समोर आली.

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) - शेतपिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांच्या स्पर्शाने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 4) समोर आली.

या प्रकरणात शंकरपूर येथील संदीप वैद्य या शेतकऱ्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान पुन्हा सहा लोकांची नावे समोर आली. या सहाही जणांना वनविभागाने अटक केली आहे. यात मुख्य आरोपीच्या लहान भावासह नातेवाइकांचाही समावेश आहे. 1 नोव्हेंबर रोजी शंकरपूर येथील संदीप वैद्य याने शेतपिकाच्या रक्षणासाठी विद्युत प्रवाह सोडला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे शेतात गेल्यानंतर विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने वाघाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या अवस्थेत त्याने विद्युतपुरवठा बंद केला व व्यायाम करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या मदतीने मृत वाघाला ओढत नेऊन शेतातच खड्डा करून पुरला. दरम्यान, दुर्गंधी सुटू नये म्हणून मीठही टाकले. दोन दिवस या घटनेचा कुणालाच पत्ता लागला नाही. मात्र शुक्रवारी या घटनेची कुजबुज सुरू होताच आरोपी संदीप गोंडपिंपरी वनविभागाकडे हजर झाला व त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

Web Title: six people were arrested tiger death

टॅग्स