गोंदियात सहा पोलिस कर्मचारी निलंबित

File photo
File photo

गोंदिया : पोलिस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलिस अधीक्षकांच्या वाहनाला अनोळखी व्यक्तीने स्क्रॅच मारला. त्यामुळे कर्तव्यात बेजबाबदारपणा किंबहुना कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी सहा पोलिस कर्मचाऱ्यांना गुरुवारी (ता. 14) निलंबित केले. या कर्मचाऱ्यांचे निलंबन मुख्यालय अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे असेल, असेही साहू यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
पोलिस हवालदार पंकज पांडे, चमनलाल नैताम, पोलिस शिपाई रोहित चव्हाण, नायक पोलिस शिपाई सुरेश चव्हाण, पोलिस शिपाई कैलास कलापार (नियुक्ती पोलिस मुख्यालय), पोलिस शिपाई छोटेलाल बिसेन (नियुक्ती रामनगर पोलिस ठाणे) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सहाही पोलिस कर्मचारी पोलिस अधीक्षक विनिता साहू यांच्या वाहनावर गार्ड संरक्षणात तैनात होते. अशातच मंगळवारी (ता. 12) पोलिस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलिस अधीक्षक यांच्या वाहनाला अनोळखी व्यक्‍तीने स्क्रॅच मारला. ही बाब पोलिस अधीक्षक विनिता साहू यांच्या लक्षात आली. त्यांनी या सहाही कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात निष्काळजीपणा, बेशिस्त व बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले. निलंबन कालावधीत कर्मचाऱ्यांचे अधिकार, कार्य काढून टाकण्यात आले आहेत. हे निलंबन आदेश अमलात असेपर्यंत या सहाही कर्मचाऱ्यांना पुढील निलंबन मुख्यालय अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे असेल, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे. अर्जुनी मोरगावच्या ठाणेदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, सकाळी व सायंकाळी पोलिस ठाण्यात हजर राहून तेथे ठेवलेल्या हजेरी पथकावर स्वाक्षरी करावी लागेल, अन्यथा निर्वाह भत्ता देता येणार नाही. असेही त्यांनी बजावले आहे. पोलिस अधीक्षकांच्या या कारवाईने पोलिस कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com