गणिताच्या पेपरला सहा विद्यार्थी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

अकोला - बारावीच्या परीक्षेत सोमवारी (ता. 6 ) गणित विषयाच्या पेपरला कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी निलंबित केले. ही कारवाई ग्रामीण भागात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळामार्फत बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये समर्थ ज्युनियर कॉलेज गायगाव, ता. बाळापूर या परीक्षा केंद्रावरील, डॉ. जगन्नाथ ढोणे कनिष्ठ महाविद्यालय अडगाव केंद्रावरील तीन, टी.के.व्ही. ज्युनिअर कॉलेज पातूर व डॉ. एच.एन. सिन्हा ज्युनिअर कॉलेज पातूर केंद्रावरील एक-एक विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आले.
Web Title: six student suspend to maths exam