सहा वर्षांनंतर कन्हान तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

टेकाडी (जि. नागपूर) :  संततधार पावसाने पुन्हा एकदा कन्हान शहराला तुडुंब भरलेल्या नदीचे रौद्र रूप पाहायला मिळाले. 2013 साली नदीला पूर आला होता त्यानंतर शुक्रवारी नदीचा पूर पाहता आला आहे. सहा वर्षांनंतर नदी दुथडी व पुराने भरून वाहत असल्याचे चित्र पाहून बघणाऱ्यांचे डोळे तृप्त झाले.

मागील काही वर्षांत कन्हान नदीला नाल्याचे स्वरू प आले होते. सहा वर्षांनंतर स्थानिकांना हा आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला आहे. परंतु, कालबाह्य ब्रिटिशकालीन पुलावरून प्रवास करताना मात्र नागरिकांना महाड नदीवरील घटनेच्या पुरावृत्तीची भीती कायम लागली होती. पावासाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरीदेखील सध्या अतिपावसाच्या रिपरिपीने चिंतातुर झालेला आहे. जूनमध्ये पावसाने उसंत घेतली असल्याने कापूस, सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. धानाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी मुबलक पाणीसाठा नसल्याने धानाची लावणी लांबवावी लागली. तर काहींचे पऱ्हेदेखील मृतावस्थेत गेले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसामुळे अनेक दिवस नागरिकांना सूर्यांचे दर्शनही झाले नाही. अशात अंकुरलेल्या पिकांवर रोगाचेदेखील सावट आले आहे. सोबतच नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six years later Kanahan Tudumb