स्वाइन फ्लूचा सहावा बळी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नागपूर - स्वाइन फ्लूने धडधड वाढविली आहे. दर दोन दिवसांनंतर खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू होत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत सहा मृत्यूची नोंद झाली. मानकापूर परिसरातील पस्तिशीतील महिलेचा मृत्यू झाला. याची खबरबात अद्याप महापालिकेला नाही. दोन स्वाइन फ्लू बाधित व्हेंटिलेटरवर आहेत. स्वाइन फ्लू वाढत असताना आरोग्य विभाग, मेडिकल आणि महापालिकेच्या आरोग्य विभागात कोणताही ताळमेळ दिसत नाही. असमन्वयामुळे खासगी रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूची नोंद उशिरा होत आहे. यावरून खासगी रुग्णालयाकडून स्वाइन फ्लूच्या नोंदी करण्यासंदर्भातील ताबा सुटला आहे. 

मार्च महिन्यात प्रचंड उकाडा असताना स्वाइन फ्लू वाढत आहे, ही गंभीर बाब आहे. स्वाइन फ्लूचा विषाणू 30 अशांपेक्षा जास्त तापमानात आठ तास तग धरू शकत नाही. परंतु, विदर्भाच्या वातावरणात हा विषाणू रुळला असल्यामुळेच स्वाइन फ्लू वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वाइन फ्लू संसर्गाची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाला सादर होत आहे. परंतु, ती उशिरा होत आहे. गतवर्षीपर्यंत नागपुरात खासगी किंवा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या संसर्गाने होणाऱ्या मृत्यूची नोंद तत्काळ होत असे. दररोज स्वाइन फ्लू बाधितांचा आढावा घेतला जात असे. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीमुळे आता स्वाइन फ्लूबाबत खासगी रुग्णालये गंभीर नसल्याचीही चर्चा पुढे आली आहे. यामुळे स्वाइन फ्लूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गंभीरपणे कोणीही पुढाकार घेत नाही. महापालिकेचा आरोग्य विभागासह मेडिकलमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे. 

सलग दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. अमरावतीसह इतर राज्यांतील रुग्णांची संख्या जास्त आहे. अवघ्या महिन्याभरात नागपुरात 22 जण स्वाइन फ्लूने ग्रस्त होते. यातील 6 जण दगावले आहेत. 

केवळ मृत्यूची नोंद 
खासगीत स्वाइन फ्लू रुग्णांना उपचार महागडे आहेत. वेळखाऊ आणि मानसिक ताण वाढविणारे आहेत. आरोग्य विभागाकडून शहरातील मेडिकल, मेयो तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाला केवळ "टॅमिफ्लू' गोळ्या उपलब्ध करून देण्यापलीकडे काही करीत नाही. खासगीत होणाऱ्या मृत्यूची नोंद करण्यापलीकडे शासन आणि महापालिकेचा आरोग्य विभाग काही काम करीत नसल्याची चर्चा आहे. 

Web Title: The sixth victim of swine flu