सियाची जपानमधील शिबिरासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागपूर : शिवाजीनगर जिमखानाची युवा बास्केटबॉलपटू सिया देवधर हिची नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) व आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघातर्फे (फिबा) आयोजित दहाव्या बास्केटबॉल विदाउट बॉडर्स आशियाई शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. शिबिर येत्या 14 ते 17 ऑगस्टदरम्यान टोकियो (जपान) येथे होणार आहे.

चार दिवसांच्या या शिबिरात आशिया, ऑस्ट्रेलिया, ओशानिया व पॅसिफिकमधील युवा बास्केटबॉलपटू सहभागी होणार आहेत. बास्केटबॉल विदाउट बॉडर्स आशिया हे एलिट बास्केटबॉल कौशल्य शिबिर असून, यात आशिया-पॅसिफिक भागातील खेळाडूंचा सहभाग असतो. सियाच्या विविध स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरी, कौशल्य व नेतृत्वगुणांच्या आधारावर एनबीए व फिबातर्फे तिची निवड करण्यात आली आहे. या शिबिराच्या निमित्ताने एनबीए व फिबाच्या अनुभवी खेळाडू व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात सियासह अन्य खेळाडूंना स्वत:च्या कामगिरीत सुधारणा करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
छत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले व विनय चिकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरनगर येथील शिवाजीनगर जिमखानाच्या कोर्टवर सराव करणाऱ्या सियाची काही महिन्यांपूर्वी फ्लोरिडा (अमेरिका) येथील डब्ल्यूएनबीए व एनसीएएच्या शिबिरासाठीही निवड झाली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siya selected for Japan basketball camp