Video नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्डातील स्लॅब कोसळले, एक ठार 

केवल जीवनतारे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या टीबी वॉर्ड परिसरात चर्मरोग विभाग आहे. गुरुवारी (ता. 12) रुग्णालयाचे काम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास वऱ्हांड्याच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. मलब्याखाली दबल्या गेल्याने या विभागात कार्यरत असलेल्या सुरक्षारकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

नागपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या टीबी वॉर्डाचे छत कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. 12) घडली. या घटनेत सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी महिलेची प्रकृतीचिंताजनक आहे. 

रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या टीबी वॉर्ड परिसरात चर्मरोग विभाग आहे. गुरुवारी (ता. 12) रुग्णालयाचे काम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास वऱ्हांड्याच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. मलब्याखाली दबल्या गेल्याने या विभागात कार्यरत असलेल्या सुरक्षारकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
 

Image may contain: one or more people, people sitting and outdoor
जेसीबीच्या सहाय्याने मलबा काढण्याचे कार्य

यापैकी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. जखमी महिला येथे उपचार घेत असलेल्या एका रुग्णाची नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक झालेल्या या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. येथे उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

Image may contain: plant and outdoor
मलबा काढण्याचे कार्य सुरू

तातडीने सुरू झाले बचावकार्य 
घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात नेण्यात आले. दुसरीकडे जेसीबीच्या सहाय्याने मलबा काढण्याचे कार्य सुरू करण्यात आले. 

अधिक माहितीसाठी - लिंक फॉलो केली अन्‌ लागला दीड लाखाचा चूना

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदोष बांधकाम 
टीबी वॉर्डच्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ठ पद्धतीने केल्याचा ठपका अधिष्ठात्यांना काही दिवसांपूर्वीच ठेवला होता. याबाबतीत संबंधित विभागाने दुरूस्तीचा प्रस्ताव देखील मेडिकलच्या प्रशासनाकडे दिला होता. तरीदेखील इमारतीच्या दुरूस्तीकडे कानाडोळा करण्यात आला. याचा भूर्दंड या घटनेच्या माध्यमातून रुग्णांना व कर्मचाऱ्यांना भोगावा लागला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slab collapses in medical TB ward, one dead