कत्तलखान्यांमधील घाण थेट रस्त्यावर

राजेश प्रायकर
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नागपूर : कत्तलखान्यांमध्ये प्राण्यांच्या कत्तलीमुळे निर्माण होणाऱ्या उत्सर्जनावर प्रक्रिया करण्यासाठी उत्सर्जन प्रक्रिया केंद्रच नसल्याची धक्कादायक बाब राज्य महालेखापालांच्या निरीक्षणात पुढे आली आहे. राज्यात मुंबईसह संत्रानगरीतील कत्तलखान्यांमध्येही उत्सर्जन प्रक्रिया केंद्राचा अभाव असल्याने ही घाण थेट रस्त्यांवर किंवा नाल्यामध्ये सोडली जात आहे. त्यामुळे शहरांच्या विविध भागात आरोग्याच्या समस्यांनी तोंड वर केले आहे.

कत्तलखान्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंधनकारक केले आहे. राज्य सरकारनेही शास्त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करूनच सांडपाण्याचा विसर्ग करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. मात्र राज्याच्या महालेखाकाराने नगर परिषद, महापालिका आदी नागरी स्थानिक संस्थांमध्ये पाहणी केल्यानंतर विदारक चित्र दिसून आले. अनेक नागरी स्थानिक संस्थांमध्ये कत्तलखानेच नाही, जेथे आहेत, तेथे सांडपाणी, उत्सर्जनावर प्रक्रिया होत नाही. काही ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कत्तलखाने बंद केल्याने रस्त्यांवर मांस विक्रीची दुकाने थाटली आहेत, असेही निरीक्षण महालेखापाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.
मुंबई, नागपूर महापालिकाही अपवाद नसून नागपुरातील मोमीनपुरा व गड्डीगोदाम येथे बकऱ्यांच्या कत्तलखान्यातही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. याशिवाय शहरात 10 किंवा त्यापेक्षा कमी जनावरांच्या कत्तलीसाठी अनेक अनधिकृत कत्तलखाने, मटन मार्केट असून यातील उत्सर्जन, सांडपाण्यावर प्रक्रियेची कुठलीही सुविधा संबंधितांनी केली नाही. दक्षिण नागपुरातील बजरंगनगर, दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील सरस्वती विहार कॉलनी तसेच पांडे ले-आऊटमध्ये मटन विक्रेते सर्व घाण बाजूच्याच नाल्यात सोडत आहे. राजधानी मुंबईतही बाराशेवर बोकडं कापण्याची दुकाने आहे. प्रतिदिन चार लाख कोंबड्या कापल्या जाते. कत्तलीनंतर उरणारे प्राण्यांचे मांस, पिसे गटारात किंवा कचरा पेटीत टाकल्या जाते. सुमारे 170 टन जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी राजधानी मुंबईतही शास्त्रोक्‍त पद्धत उपलब्ध नाही. मात्र, नागपूरप्रमाणे मुंबई महापालिकाही या दुकानांवर कारवाई करीत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
भांडेवाडीत पुरली जाते घाण
शहरातील कत्तलखान्यातील कत्तलीमुळे निर्माण होणारे उत्सर्जन भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये खड्डा खोदून पुरले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. त्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित होण्याची शक्‍यता बळावली आहे.

Web Title: slauter house west material on road