प्रहार जनशक्ती पक्षाचे झोपा काढा आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

मलकापूर : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येथील नगर पालिकेच्या समोर आज (ता.12) विविध मागण्यांसाठी झोपा काढा आंदोलन करण्यात आले.

मलकापूर : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येथील नगर पालिकेच्या समोर आज (ता.12) विविध मागण्यांसाठी झोपा काढा आंदोलन करण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाने आरोप केला आहे की, मलकापूर शहरात नियम धाब्यावर बसवून शॉपिंग काॅम्प्लेक्सचे बांधकाम करण्यात आले. या शाॅपिंग काॅम्प्लेक्स समोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने बुलडाणा रोडवरील जवळपास सर्वच बँकासमोर दररोज वाहतूकीची कोंडी निर्माण होते. या सर्व प्रकाराला तात्कालीन मुख्याधिकारी व तात्कालीन बांधकाम अधिकारी हेच जबाबदार आहे, या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 30 जूनला शिट्टी बजाव आंदोलन करूनही निगरगट्ट व कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपालिका प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने आज (ता. 12) झोपा काढा आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपप्रमूख अजय टप म्हणाले की नगरपालिका प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्यास बत्ती दे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी शालीकराम पाटील तालुका युवा प्रमुख अमोल बावस्कार, शेषराव संभारे, युवा प्रमुख अर्जून पाटील, शिवाजी भगत, उमेश वैष्णव, देवीदास बोबंटकार, कौतीक बोराडे, राहूल तायडे, पप्पू ठाकुर, वैभव राठोड, बलराम बावस्कर, अजाबराव वाघ, नविल वाघ, देवा बावस्कर, विशाल आमले, प्रेम बोरे, अमोल हरसूलकर, निवृत्ती बाम्हंदे, प्रमोद भिसे, दोरण सोनोने, विनोद बाठे आंदोलनात सहभागी होते.

Web Title: sleep agitation by prahar janshakti