नागपुरात शांततेत पण संथगतीने मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नागपूर - नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) सकाळपासून अत्यंत शांतेतत परंतु संथगतीने मतदान सुरू आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत शहरातील 32 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

नागपूर - नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) सकाळपासून अत्यंत शांतेतत परंतु संथगतीने मतदान सुरू आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत शहरातील 32 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर महापालिकेच्या निकालाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. या दोन्ही नेत्यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. नागपुरमध्ये इतरत्रही शांततेत मतदान सुरू आहे. कोणत्याही हिंसाचाराचे वृत्त अद्याप आलेले नाही. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तुरळक घटना घडल्या. महापौर प्रवीण दटके यांच्यासोबत कॉंग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्यासोबत शाब्दीक चकमक उडाली. त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊतही उपस्थित होते. काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

Web Title: Slow voting in Nagpur