चार महिन्यांत सर्व झोपडपट्टीवासींना पट्टे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर - उत्तर नागपूरसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस असून, नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात येत आहे. गरिबांना त्यांचे अधिकार मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या चार महिन्यांत नासुप्रच्या जागेवरील सर्व झोपडपट्टीधारकांना पट्टे देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. 

नागपूर सुधार प्रन्यास हद्दीतील उत्तर नागपुरातील कस्तुरबानगर व इंदिरानगर झोपडपट्टीवासींना मालकी हक्क पट्टे वितरणाचा समारंभ जरीपटक्‍यात पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी होते. 

मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, मिलिंद माने, गिरीश व्यास, नासुप्र विश्‍वस्त विकी कुकरेजा, भूषण शिंगणे, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, महाव्यवस्थापक अजय रामटेके, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अभियंता (उत्तर) चिमूरकर, राऊत उपस्थित होते. या वेळी इंदिरानगर झोपडपट्टीतील ४२८ झोपड्यांना पीटीएस क्रमांक देण्यात आला. यापैकी ६९ झोपड्या खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित जागेवर वसलेल्या आहेत, ९७ झोपड्या इतर खसऱ्यात येतात. त्यामुळे उर्वरित २६२ झोपडपट्टीधारक पट्ट्यासाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले. कस्तुरबानगर झोपडपट्टीतील १०० झोपड्यांना पीटीएस क्रमांक देण्यात आले. यापैकी ११ अर्ज प्राप्त असून ८९ झोपडपट्टीवासींनी कागदपत्रे सादर केले. यातील ४८ झोपडपट्टीवासी पात्र आहेत. उर्वरित झोपडपट्टीवासींनी वर्ष २००० पूर्वीचे वास्तव्याचे दस्तावेज सादर केले नाही. त्यामुळे ते अपात्र ठरल्याचेही यावेळी  नमूद करण्यात आले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार महाव्यवस्थापक अजय रामटेके यांनी मानले.
 
समस्या मार्गी लागली - केंद्रीय मंत्री गडकरी
उत्तर नागपुरातील झोपडपट्टीवासींना मालकी हक्‍काच्या पट्ट्यांची प्रतीक्षा होती. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती. शहराच्या इतर प्रलंबित प्रश्‍नांप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेश काढून हा प्रश्‍न मार्गी लावल्याचे गडकरी यांनी नमूद केले. शहरातील झोपडपट्टीतील गरीब लोकांना याचा फायदा होणार आहे. नासुप्रने योग्यरीतीने झोपडपट्टी सर्वेक्षण केल्याची पावतीही त्यांनी दिली.

Web Title: slum Proprietary rights lease