स्मार्ट सिटींच्या प्रतिनिधींचे शिखर संमेलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या देशभरातील सुमारे शंभर शहरांतील पदाधिकारी, अधिकारी, वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ तसेच विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोनदिवसीय स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी समिट ऍण्ड एक्‍स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्त एकमेकांचे तंत्रज्ञान, प्रकल्प आणि विचारांचेसुद्धा आदानप्रदान होणार आहे.

नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या देशभरातील सुमारे शंभर शहरांतील पदाधिकारी, अधिकारी, वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ तसेच विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोनदिवसीय स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी समिट ऍण्ड एक्‍स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्त एकमेकांचे तंत्रज्ञान, प्रकल्प आणि विचारांचेसुद्धा आदानप्रदान होणार आहे.

महापालिका आणि ईलिट्‌स टेक्‍नोमीडिया या कंपनीच्या सहकार्याने होणाऱ्या स्मार्ट शिखर परिषदेला शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हॉटेल ली मेरिडियन येथे प्रारंभ होईल. स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट शासन, स्मार्ट वाहतूक आणि स्मार्ट पायाभूत सुविधा यावर विचारमंधन होईल.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. तसेच स्मार्ट आयडियांचीसुद्धा देवाघेवाण होणार आहे. उद्‌घाटनाला महापौर नंदा जिचकार, सत्तापक्षनेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महामेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहतील. शनिवारी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक ते दोन यावेळी नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन आणि प्रश्‍नोत्तरे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पावणेतीन वाजता सर्वांसोबत संवाद साधणार आहेत. देशभरातील अनेक महापौर आणि महापालिका आयुक्त नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. काही उद्या सकाळी पोहोचणार आहेत. वेगवेगळ्या शहारातील सुमारे चारशे ते पाचशे प्रतिनिधी स्मार्ट शिखर संमेलनात सहभागी होणार असल्याचे महापौर नंदा जिचकार आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्मार्ट आयडियांची देवाणघेवाण
स्मार्ट शिखर परिषदेत वेववेगळ्या शहरांनी राबविलेले उपक्रम आणि योजनांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे. याकरिता प्रदर्शनसुद्धा भरविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री, गडकरी साधणार संवाद
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी परिषदेत उपस्थितांसोबत थेट संवाद साधणार आहेत. स्वीडन, जपान, पॅरिस आदी विकसित देशांचे प्रतिनिधीसुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत.

बार्सिलोना..
आंतराष्ट्रीय चित्रपटाचा प्रीमियर

बार्सिलोना स्मार्ट सिटी होत असताना काय घडले, बदल झाले यावर आधारित ऑस्कर अवॉर्ड विजेते दिग्दर्शक वुडी ऍलन यांनी तयार केलेल्या "बार्सिलोना द रोज ऑफ फायर' या चित्रपटाचा प्रीमियर उद्या शुक्रवारी पीव्हीआर येथे सायंकाळी सहा वाजता होईल.

Web Title: smart city leader summit meeting