स्मार्ट सिटी मानांकनात नागपूर पुन्हा अव्वल

स्मार्ट सिटी मानांकनात  नागपूर पुन्हा अव्वल
नागपूर : गेल्या काही महिन्यांत स्मार्ट सिटी मानांकनात पहिल्या स्थानावरून घसरलेल्या नागपूरने मानांकन यादीत अव्वल स्थान पटकावले. मागील चार महिन्यात विविध विकास कामांना आलेल्या वेगामुळे नागपूरने अव्वल स्थानावर झेप घेतली.
केंद्र सरकारचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय दर शुक्रवारी देशातील स्मार्ट सिटीचे मानांकन घोषित करते. काल घोषित केलेल्या स्मार्ट सिटीच्या मानांकनात अहमदाबादला मागे टाकत नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर अहमदाबाद आहे. नागपूर शहर 364.47 गुण घेऊन प्रथम क्रमांकावर तर 362.34 गुणांसह अहमदाबाद दुसऱ्या स्थानी आहे. मागील चार महिन्याच कालावधीत केलेल्या प्रयत्नामुळे शहराला हे स्थान प्राप्त झाले आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शहरात 21 प्रकल्पांवर कार्य सुरू असून 51 किलोमीटरचे रस्ते व होम स्विट होमचे कार्य प्रगतीपथावर आहे. नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत 3600 सीसीटीव्ही विविध स्थानी लावण्यात आले. त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत आहे. आपत्तीव्यवस्थापनमध्ये सुद्धा सीसीटीव्हीचे फार मोठे योगदान आहे.
स्मार्ट सिटीच्या अंतर्गत पारडी, भरतवाडा, पुनापुर व भांडेवाडीच्या 1730 एकर क्षेत्रात विकास कार्य प्रस्तावित आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून 3322 कोटी रूपयाचे विकास कार्य सुरू आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने या भागात प्रकल्प आकार घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com