देशभरातील महापौर, आयुक्तांची शहरात मांदियाळी

राजेश प्रायकर
शनिवार, 18 मार्च 2017

‘स्मार्ट सिटी’चे एप्रिलमध्ये शिखर संमेलन - शंभर शहरांचे पदाधिकारी, अधिकारी येणार 
नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर संत्रानगरीत केंद्राच्या या योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या वेगाने इतर शहरांचेही लक्ष वेधले आहे. पुढील महिन्यात ७ व ८ एप्रिलला शिखर संमेलन व परिषद होणार आहे. यासाठी केंद्राने स्मार्ट सिटी योजनेत निवडलेल्या सर्व शंभर शहरांचे महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहरात येणार आहेत. 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत नागपूरचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला. मात्र, स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीत पहिल्या टप्प्यातील शहरांनाही संत्रानगरीने मागे टाकले आहे. सध्या शहरात राज्य शासनाकडून स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी या ५२० कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १२६ कोटींची कामे झाली आहेत. या प्रकल्पासाठी नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबेल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही एसपीव्ही स्थापन करण्यात आली. नुकताच एसपीव्हीला केंद्र व राज्य शासनाकडून १३७ कोटी मिळाले. स्मार्ट सिटीअंतर्गत ‘टाउन प्लॅनिंग स्किम’ सुरू होणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन केंद्रातर्फे (प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट युनिट) टाउन प्लॅनिंग स्किमची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी तीन प्रस्ताव आले आहेत. यातील एकाची निवड करून टाउन प्लॅनिंग स्किम सुरू करण्यात येणार आहे. एरिबा बेस्ड डेव्हलपमेंटअंतर्गत पारडी, पुनापूर, भरतवाडा येथे पायाभूत सुविधांसोबत ड्रेनेज लाइन, पथदिवे याशिवाय चार हजार परवडणाऱ्या घरांची योजना आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय नगरविकास मंत्र्यांना निमंत्रण
शिखर संमेलन व परिषदेच्या उद्‌घाटनासाठी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यालयाशी संपर्क सुरू आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

विदर्भातील सर्वच स्थानिक संस्थांचा सहभाग 
स्मार्ट सिटीतील प्रकल्प त्यांनाही राबवून शहराचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी विदर्भातील सर्व महापालिका, नगर परिषदांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

देश-विदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
संमेलनात स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रमांबाबत देशातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. याशिवाय विदेशातील स्मार्ट सिटी प्रकल्प राबविणारे तज्ज्ञही अत्याधुनिक प्रकल्पांबाबत ‘टिप्स’ देतील.

Web Title: smart city shikhar sammelan