स्मार्ट सिटी "टाऊन प्लानिंग स्किम'ला मंजुरी

File photo
File photo

स्मार्ट सिटी "टाऊन प्लानिंग स्किम'ला मंजुरी
नागपूर : पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, पारडी व भांडेवाडी येथे स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. एसपीव्हीने तयार केलेल्या टाऊन प्लानिंग स्किमला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी प्रकल्प साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पातील एरिया बेस्ट डेव्हलपमेंटअंतर्गत निवडलेल्या भरतवाडा, पूनापूर, पारडी व भांडेवाडी 1,730 एकरातील नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा पथदिवे, भूमिगत गडर लाइन, हॉस्पिटल, उद्यान, शाळा आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी टाऊन प्लानिंग स्किम तयार करण्यासाठी नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने प्राथमिक आराखडा तयार केला होता. यावर पूर्व नागपुरातील नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे स्मार्ट सिटी एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी या परिसरातील जमीन मालक व नागरिकांशी संवाद साधला. एक लाख 30 हजार लोकसंख्या व 25 हजार कुटुबांचे वास्तव्य असलेल्या या भागाच्या प्राथमिक आराखड्यावर या परिसरातील नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार टाऊन प्लानिंग स्किम तयार करून ती नासुप्रकडे पाठविली होती. नासुप्रचा मोठा भाग स्मार्ट सिटी प्रकल्पात येत असल्याने या संस्थेची मंजुरी आवश्‍यक होती. नासुप्रने मंजूर केल्यानंतर टीपी स्किम राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली होती. त्यास सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे आता स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची शक्‍यता आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पूर्व नागपुरातील भागासाठी तयार केलेल्या टीपी स्किमला राज्य सरकारने मंजुरी दिली. शापूर्जी-पालनजी ही कंपनी प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असून, कार्यादेशही देण्यात आले. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल.
- डॉ. रामनाथ सोनवणे,
सीईओ, नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com