स्मार्ट सिटी प्रकल्पग्रस्तांना जमीन, घरे देणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नागपूर : स्मार्ट सिटीअंतर्गत भवानी माता मंदिर मार्गाच्या रुंदीकरणासह सहा प्रकल्पांमधील प्रकल्पग्रस्तांना भरपाई म्हणून घर आणि जमीन देण्यात येणार आहे.

नागपूर : स्मार्ट सिटीअंतर्गत भवानी माता मंदिर मार्गाच्या रुंदीकरणासह सहा प्रकल्पांमधील प्रकल्पग्रस्तांना भरपाई म्हणून घर आणि जमीन देण्यात येणार आहे.
नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टनेबल सिटी डेव्हलपेंट कारर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने प्रकल्पग्रस्तांची भेट घेतल्या जात आहे. रस्ते रुंदीकरणात तसेच इतर प्रकल्पात घर गेल्यास घर आणि जमिनीच्या बदल्यात जमीन दिल्या जाणार आहे. बुधवारी स्मार्ट सिटीच्या मनपा मुख्यालयातील कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, लकडगंज झोनचे माजी सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेविका वैशाली वैद्य यांनी प्रकल्पग्रस्तांना जमिनीची कागदपत्रे आज सोपविली. डॉ. सोनवणे यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांना घर बांधण्यासाठी नुकसानभरपाई दिली जाईल.
जेव्हापर्यंत घराचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत भाड्याची रक्कमही दिली जाणार आहे. तीन हप्त्यात ही रक्कम दिली जाईल तसेच स्मार्ट सिटीच्यावतीने शिफ्टिंग व वाहतुकीचाही खर्च दिला जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart City will provide land, houses to project victims