स्मार्ट गावाची निवड लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

निधीचा अडसर - प्रत्येकी १० लाख रुपयांचा पुरस्कार

नागपूर - शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्मार्ट लुक देण्यासाठी शासनातर्फे स्मार्ट ग्राम व स्मार्ट जिल्ह्यासाठी १० ते ५० लाख रुपयांपर्यंत पुरस्कार दिला जाणार होता. मात्र, निधीअभावी स्मार्ट जिल्हास्तरावरील गाव निवडीची प्रक्रिया तूर्तास लांबणीवर टाकली आहे.

राज्यभरात जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे स्मार्ट ग्राम व स्मार्ट जिल्हा योजनेची  अंमलबजावणी यावर्षीपासून करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील एक गावाची स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील १३ गावांची निवड गटविकास अधिकाऱ्यांच्या समावेश असलेल्या समितीने केली. त्यानंतर या १३ गावांपैकी एक गावाची स्मार्ट जिल्हास्तरावर एका गावाची निवड केली जाणार होती. यासाठी जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, अधिकारी यांच्या समावेश असलेली समिती स्मार्ट ग्रामसाठी निवड झालेल्या १३ गावांना भेटी देऊन त्यातील एका गावाची स्मार्ट जिल्हास्तरावर निवड करणार होती. 

स्मार्ट जिल्हा आणि स्मार्ट ग्राम पुरस्काराची घोषणा १ मे महाराष्ट्र दिनी करण्यात येण्यात होणार होती. त्यापैकी १३ स्मार्ट ग्रामच्या नावाची घोषणा करून त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. स्मार्ट जिल्हास्तरावरील गावाच्या पुरस्काराची घोषणा करणे जिल्हा परिषद प्रशासनाने टाळल्याची चर्चा आहे. 

१३ स्मार्ट ग्रामची प्रतीक्षा
जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी निवड झालेल्या गावाला ५० लाखांचे पारितोषिक दिले जाणार होते. पुरस्कार स्वरूपात प्राप्त होणारी रक्कम गावातील विकासकामांवर खर्च केली जाणार होती. त्यामुळे गावकऱ्यांनासुद्धा याबाबत उत्सुकता होती. मात्र, या योजनेसाठी निधीची अडचण निर्माण झाल्याने शासनाने जिल्हास्तरावर निवडल्या जाणाऱ्या स्मार्ट ग्राम पुरस्काराची निवड करणे तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधीचे पत्रदेखील जिल्हा परिषद पंचायत विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे १३ स्मार्ट ग्राममधील स्मार्ट जिल्हास्तरावर निवडले जाणारे गाव कोणते, यासाठी गावकऱ्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: smart village selection Prolonged