मेकअप किटमधून कोकीन तस्करी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - दक्षिण आफ्रिकेतून महिलांच्या मेकअप किटद्वारे नागपूरमार्गे गोव्यात होणाऱ्या कोकीन तस्करीवर नार्कोटीक्‍स क्राईम ब्युरोने (एनसीबी) छापा घातला. नागपुरातून महिलेला एनसीबीने अटक करून मुंबईला नेले. या प्रकरणात मायलेकीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. ही कारवाई चार दिवसांपूर्वी केल्याची माहिती आहे. 

इंदोरा चौकात राहणारे रामटेके यांची मुलगी हैदराबादला शिक्षण घेत होती. तिची नायजेरियन युवकाशी ओळख झाली. त्यांनी मैत्री झाल्यानंतर प्रेमविवाह केला. सहा वर्षांपासून ते दोघे गोव्यात राहतात. त्या नायजेरियन युवकाचा कोकीन तस्करीचा व्यवसाय होता. त्यामध्ये नागपुरातील युवतीनेही सहभाग घेतला. आफ्रिकेतून मेकअप किटमध्ये पार्सलने 360 ग्रॅम कोकीन नागपुरात आले होते. ते कोकीन नागपुरातील 36 वर्षीय महिलेने स्वीकारताच दबा धरून बसलेले एनसीबीच्या पथकाने छापा घालून महिलेला अटक केली. तसेच ते कोकीने गोव्याला असलेल्या मुलीकडे जाणार होते, याची कल्पना असल्याने पोलिसांनी गोव्यातून मुलीला अटक केली. या कोकीनची किंमत जवळपास एक कोटी पाच लाख रुपये असल्याची माहिती आहे. 

Web Title: Smoky cocaine from make-up kits