बापरे बाप! कारमध्ये काय आढळलं? वाचा... (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

साप... नुसत्या नावाने भल्याभल्यांना कापरे भारतात. अशात कुणाच्या घरात, शेतात, फ्लॅटमध्ये एखादा साप घुसला तर सर्वत्र चर्चेचा विषय होऊन जातो. "साप... साप... साप...' असे ओरडत फिरतात आणि दुसऱ्यांना भयभीत करतात. त्यामुळे लोक भीतभीत साप पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी करीत असतात. अशीच एक थरारक घटना गुरुवारी यवतमाळमध्ये घडली. पाहुणे म्हणून आलेल्या नातेवाईकांच्या कारमध्ये साप घुसल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.

यवतमाळ : "बापरे बाप! कारमध्ये काय आढळलं?' हा मथळा वाचून तुमच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण झाले असतीलच. कार तर चारही बाजूनी बंद असते. मग कारमध्ये असं कायं गेले असले, असा प्रश्‍न स्वत:ला आणि दुसऱ्यांना नक्की विचारत असालं. कोणी बॉम्ब ठेवला असेल?, मृतदेह तर नसेल ना? कुणी अडकलं तर नसेल? असे नानाविध प्रश्‍न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. परंतु, यातील काहीही नसून तर चक्‍क साप आढळला. होय... साप आढळला. ज्याला पाहताच अनेकांचा थरकाप उडतो, तो साप.... 

साप... नुसत्या नावाने भल्याभल्यांना कापरे भारतात. अशात कुणाच्या घरात, शेतात, फ्लॅटमध्ये एखादा साप घुसला तर सर्वत्र चर्चेचा विषय होऊन जातो. भयभीत झालेले लोक ती जागा सोडून दुसरीकडे पळून जातात. "साप... साप... साप...' असे ओरडत फिरतात आणि दुसऱ्यांना भयभीत करतात. त्यामुळे लोक भीतभीत साप पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी करीत असतात. "बरं झालं रे बाबा' साप आपल्या घरी आला नाही, असे म्हणून स्वत:ची समजूत काढीत असतात. दुसरीकडे भीतभीत सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा सल्ला दुसऱ्यांना देत असतात. 

अशीच एक थरारक घटना गुरुवारी यवतमाळमध्ये घडली. पाहुणे म्हणून आलेल्या नातेवाईकांच्या कारमध्ये साप घुसल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. यवतमाळ येथील प्रसिद्ध वकील गंगलवार यांच्याकडे गुरुवारी (ता. 7) पाहुणे आले होते. पाहुण्यांनी कार पार्क केली आणि गंगलवार यांच्या घरी जाण्यासाठी ते निघाले. मात्र, त्यांना कारखाली साप जाताना दिसला. यामुळे सर्वजण भयभीत झाले होते. 

मात्र, कार चालकाने सावध पवित्रा घेत सापाच्या हालचाली टिपल्या. पाहता पाहता साप कारखाली इंजिनकडच्या खुल्या जागेतून आतमध्ये शिरला. यामुळे आता सापाला इंजिनच्या पोकळीतून बाहेर कसे काढायचे, असा प्रश्‍न वकील गंगलवार व पाहुण्यांना पडला. सर्व भयभीत झाल्याने कुणाचेही डोके काम करीत नव्हते. मात्र, कार चालकाने शक्कल लढविली व कार वॉशिंग सेंटरला नेण्याचे ठरवले. मात्र, सर्वांनी सुरेक्षेच्या दृष्टीने याला विरोध केला. 

मात्र, कार चालकाने कशीबशी बार वॉशिंग सेंटरला नेली. तिथे कार जॅकच्या मदतीने उंच उचलण्यात आली. तोवर सर्पमित्र नीलेश मेश्राम तिथे बोलवले होते. पाण्याचा मारा आणि कार सुरू करून सापाला खेचून बाहेर काढण्यात आले. साप खाली येताच एका होलमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, सर्पमित्र नीलेशने पायाने होल बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तितक्‍यात सापाने नीलेशच्या पायाला चावा घेतला. साप बिनविषारी असल्यामुळे नीलेशला विषबाधा झाली नाही. साप पकडल्यानंतर नीलेशने जंगलात सोडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The snake found in the car