सापांशी मैत्रीने जीवनच बदलून गेले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

नागपूर : बाबा आमटे यांच्या शिबिराला गेलो आणि माझ्यात आमूलाग्र बदल झाला. माझी सापांशी मैत्री झाली. विकास आमटे यांचे मार्गदर्शन मिळाले. हळूहळू प्राण्यांसाठी काम करणे सुरू केले. समाज माझ्यावर हसायचा. माझ्या अशा वागण्याने कुटुंबीय त्रस्त होते. असेच एके दिवशी माझे प्राणिप्रेम मनेका गांधींपर्यंत पोहचले. त्यांनी दिल्लीला बोलवले. या प्रसंगाने मी अर्धे जग जिंकले होते. आशीष गोस्वामी यांनी सांगितलेल्या प्रसंगांनी उपस्थित विद्यार्थी नि:शब्द झाले. निमित्त होते माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या "तरुणाईच्या वेगळ्या वाटा' कार्यक्रमाचे.

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान आणि मोहन मते मित्र परिवारच्या वतीने "तरुणाईच्या वेगळ्या वाटा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लाखो तरुणांना आत्मविश्वासाचे पंख देणारा शिक्षक अशी ओळख असलेले अभिजित धर्माधिकारी, सायकलने भारतभ्रमण करत भयमुक्त जीवनाचा मार्ग दाखवणारे अंकित अरोरा आणि पर्यावरण संतुलनासाठी धडपडणारा प्राणिमित्र आशीष गोस्वामी यांनी जीवनातील रहस्यांचा उलगडा केला. कार्यक्रमाला आमदार नागो गाणार, अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे शाखा नीलेश भरणे, ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव, नागपूर विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागप्रमुख शरद सूर्यवंशी, डॉ. मनीष श्रीगिरीवार, विलास तेलगोटे व माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन मते यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. वेगळ्या वाटा जोपासणाऱ्यांची लेखक, वक्‍ते व समुपदेशक व मुलाखतकार जळगावचे मनोज गोविंदवार यांनी मुलाखत घेतली. प्रास्ताविक मोहन मते यांनी केले. संचालन अभिजित मुळे यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake friendships changed lives