कृत्रिम श्‍वासोच्छ्वासाने सापाला जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

हिंगणा : तालुक्‍यातील उखळी येथील सागर देशमुख यांच्या शेतात आढळलेल्या मरणासन्न अवस्थेतील सापाला कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देऊन त्याला जीवनदान देण्याचे काम सर्पमित्र पराग वानखेडे यांनी केले.

हिंगणा : तालुक्‍यातील उखळी येथील सागर देशमुख यांच्या शेतात आढळलेल्या मरणासन्न अवस्थेतील सापाला कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देऊन त्याला जीवनदान देण्याचे काम सर्पमित्र पराग वानखेडे यांनी केले.
19 ऑगस्टला दुपारी चार वाजता सागर देशमुख यांच्या शेतात साप निघाला. त्यांनी सर्पमित्र पराग वानखेडे व सागर अधडकर यांना कळवले. दोघेही शेतात पोहोचलेत. तो साप धामण जातीचा बिनविषारी होता. साप मरणासन्न अवस्थेत होता. थोडीफारही हालचाल करत नव्हता. परागने वेळ वाया जाऊ न देता सापाला वाचवण्यासाठी सापाचे तोंड उघडून त्याला आपल्या तोंडाने कृत्रिम श्‍वासोच्छ्वास दिला. त्यामुळे थोड्याच वेळात साप हालचाली करू लागला. सापाला जीवनदान मिळाले. नंतर सापाला दूर नाल्यानजीक सोडले. धामण साप पाण्यावर पोहू लागले. याआधीही अर्धमेल्या विषारी नागाला अशाच प्रकारे वाचवल्याचे पराग वानखेडे यांनी सांगितले. पीपल्स फॉर ऍनिमल ग्रुपचा तो प्रमुख आहे. रात्री बेरात्रीही पी.एफ.ए. ग्रुपचे सर्पमित्र कॉल येताच सापाच्या सुरक्षिततेसाठी धावून जातात, हे विशेष.

Web Title: snake news in nagpur

टॅग्स