वीजचोरांना एसएनडीएलचा शॉक

file photo
file photo

वीजचोरांना एसएनडीएलचा शॉक
नागपूर :: शहरातील वीजचोरांविरुद्ध एसएनडीएलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी पूर्व नागपुरातील वसाहतींमध्ये राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत वीजचोरीची एकूण 15 प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. या ठिकाणी एकूण 10 लाखांची वीजचोरी होत असल्याचे असेसमेंट करण्यात आले आहे.
उकाड्यामुळे घरातील पंखे, कूलर दिवसभर सुरू ठेवावे लागत आहे. यामुळे वीजबिल भरमसाट येत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी वीजचोरीचा मार्ग स्वीकारला. वीजहानीची आकडेवरी आणि वीजचोरीसंदर्भात मिळालेल्या तक्रारींवरून सोमवारी नयापुरा, बस्तरवारी, लकडगंज, शांतीनगरातील वसाहतींमध्ये धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. एसएनडीएलच्या पथकाने अचानक धडक देत एकूण 85 ग्राहकांकडे तपासणी केली. त्यात 15 ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे लक्षात आले. वीजचोरीच्या पद्धती वेगवेगळ्या असल्याचे निष्पन्न झाले. पूर्वी वीजतारांवर हूक टाकून चोरी करण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, अशा पद्धतीने चोरी धोकादायक असून सापडले जाण्याची शक्‍यताही अधिक असते. यामुळे वीजतारांवर हूक टाकण्याचे प्रमाण फार घटले आहे. सोमवारच्या कारवाईत हूक टाकल्याचे एकच प्रकरण आढळले. त्याद्वारे 40 हजारांची वीजचोरी झाल्याचे असेसमेंट करण्यात आले आहे. मीटरमध्ये छेडछाड करण्याची दोन प्रकरणे उघडकीस आली असून, या माध्यमातून चोरी करण्यात आलेल्या विजेची किंमत दीड लाखाच्या घरात आहे. सर्वाधिक सात प्रकरणे सर्व्हिस वायरमध्ये टॅपिंगची आहेत. या पद्धतीने 3.05 लाखांची चोरी झाल्याचे असेसमेंट करण्यात आले आहे. यापुढेसुद्धा ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे एसएनडीएलने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com