३० वर्षांपासून विजेसाठी लढणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या जीवनात प्रकाश

३० वर्षांपासून विजेसाठी लढणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या जीवनात प्रकाश

भातकुली (जि. अमरावती) : एक घर आणि मंदिर अशा ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याने (Elderly couple) वीजपुरवठा (Power supply) मिळावा म्हणून तीस वर्षांपासून लढा सुरू केला. परंतु, सकारात्मक तोडगा निघत नव्हता. अखेर महावितरणचे सहायक अभियंता योगेश लहाने यांनी पुढाकार घेऊन दाम्पत्याचे उर्वरित आयुष्य प्रकाशमय केले. (Social Commitment of MSEDCL Engineers)

भातकुली आसरा मार्गावरील दहातोंडा फाट्यावर अजाबराव विश्वासराव ताथोड हे पत्नीसह ५० वर्षांपासून येथे घर वजा मंदिरात वास्तव्यास आहेत. त्यांनी गत ३० वर्षापासून वीज पुरवठा मिळण्यासाठी पूर्वीची एमएसईबी व आताच्या महावितरण तसेच जनप्रतिनिधींकडे वीजपुरवठा मिळण्याकरिता पाठपुरावा केला. वय थकल्यामुळे शेवटी त्यांनी वीज मिळण्याचे प्रयत्न सोडून दिले.

३० वर्षांपासून विजेसाठी लढणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या जीवनात प्रकाश
कोरोना झाला की सर्व संपले असे नाही; रुग्णालयाचा अट्टाहास सोडा

साहेब मी आता बिना लाईटचा मरतो, तुम्ही काही टेंशन घेऊ नका. अशा शब्दात वृद्धाने आपल्या भावना व्यक्त केल्या. विजेसाठी एक छोटे रोहित्र मिळून अंदाजे २ लाख रुपये खर्च लागणार होते. हे काम एका व्यक्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे ते नामंजूर झाले. शेवटचा पर्याय स्वखर्चाने हे काम करायचे होते.

दाम्पत्य अत्यंत गरीब असल्यामुळे भातकुली येथील सहायक अभियंता योगेश लहाने यांनी लोकवर्गणी जमा करून व स्वतः पुढाकार घेऊन अंदाजपत्रक तयार करून छोट्या स्कीममध्ये काम करण्याचे ठरविले व एका महिन्यात प्रशासकीय मान्यता प्राप्त करून भातकुली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांच्याहस्ते या रोहित्रचे उद्‌घाटन करून ताथोड यांच्या कुटुंबाला वीज मिळवून दिली.

३० वर्षांपासून विजेसाठी लढणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या जीवनात प्रकाश
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात
आज हातून एक चांगले कार्य घडले. वृद्ध व्यक्ती विद्युत पुरवठ्यापासून वंचित होती. शेवटी लोकवर्गणी करण्याचा निर्णय घेतला आणि वीज मिळवून दिली. त्याचे समाधान आहे.
- योगेश लहाने, कनिष्ठ अभियंता, महावितरण
वृद्ध जोडप्याच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. तो त्यांनी आनंदाश्रूच्या माध्यमातून मोकळा केला. या अभियंत्याचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे.
- विजयकुमार वाकसे, पोलिस निरीक्षक, भातकुली

(Social Commitment of MSEDCL Engineers)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com