हाँगकाँगला राहणाऱ्या संध्या जाणेंची सामाजिक बांधिलकी 

The social commitment of staying alive in Hong Kong
The social commitment of staying alive in Hong Kong

अकोला : प्रसिद्ध कवी किशोर बळी यांनी कानशिवणी येथील शिक्षकांच्या पुस्तक भिशी उपक्रमाविषयीची फेसबुकवर पोस्ट केली होती. ती वाचून हाँगकाँग येथे राहणाऱ्या मूळ वैदर्भीय असलेल्या संध्या जाणे यांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी तसेच, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत म्हणून पंधरा हजार रुपये इतकी रक्कम पाठविली आहे. त्यानुसार कानशिवणी येथील वाचनालयासाठी पुस्तके आणि टाकळी (छबिले) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. 

बार्शीटाकळी तालुक्यातील टाकळी (छबिले) ह्या अवघड क्षेत्रातील गावात असलेल्या प्राथमिक शाळेवर बळी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तेथील मुलांसाठी बुट-मोजे, टाय-बेल्ट, वह्या, बास्केट, टिफिन बॉक्स्, पाण्यासाठी बाटली आणि वाचनालयासाठी बालसाहित्याची पुस्तके इत्यादी शालोपयोगी साहित्याचे वाटप गावकरी मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले. विदेशात राहूनही आपल्या देशातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी तळमळ बाळगणाऱ्या संध्या जाणे यांनी साधनसुविधांच्या अभावात शिक्षण घेत असलेल्या मुलांना सहकार्य करून राष्ट्रभान जपणे, हे आपले कर्तव्यच आहे, अशी भावना व्यक्त केली आहे. 

सरपंच नंदा चोटमल, शाळा समिती अध्यक्ष अनिल चोटमल, उपाध्यक्ष नागोराव छबिले, संगीता महल्ले, सुरेखा छबिले, साधना छबिले, भारत चोटमल, गजानन चोटमल, पवित्र इंगळे, गजानन छबिले, नागेश चोटमल, विद्या डोंगरे, अंबादास छबिले, पांडुरंग छबिले, बबन छबिले आणि गावकरी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर बळी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका शारदा माहोरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com