'गाव तिथं बिअरबार'चं अश्वासन देणाऱ्या वनिता राऊत पराभवानंतर काय म्हणाल्या? (व्हिडिओ)

social media chandrapur chimur woman candidate vanita raut reaction
social media chandrapur chimur woman candidate vanita raut reaction

चिमूर (जि. चंद्रपूर) : यंदाची विधानसभा निवडणूक दिग्गज नेत्यांच्या लढतीसह अनेक कारणांनी चर्चेत राहिली. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघ अखिल भारतीय मानवता पक्षाची नवखी उमेदवार वनिता राऊत यांनी दिलेल्या आश्‍वासनांमुळे नेहमीच लक्षात राहील. "गाव तेथे बिअरबार', "दारिद्य्ररेषेखालील कुटुंबाला सवलतीच्या दरात रेशन कार्डावर दारू', "कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचे व विक्रीचे आश्‍वासन' जाहीरनाम्यातून देत चिमूर निर्वाचन क्षेत्रातील एकमेव महिला उमेदवार वनिता जितेंद्र राऊत प्रकाशझोतात आल्या होत्या. मात्र, मतदारांनी त्यांना 286 मत देत स्पष्टपणे नाकारले. लोकांना बेकायदेशीर मार्गानेच दारू प्यायची असल्याने नाकारल्याची प्रतिक्रिया वनिता राऊत यांनी व्यक्‍त केली.

राष्ट्रवादीला पंक्चर गाडी म्हणणाऱ्यांना, खासदार कोल्हे यांचे उत्तर 

चंद्रपूर जिल्ह्यात 1 मे 2015 रोजी दारूबंदी लागू झाली. विदर्भात वर्धा, गडचिरोलीनंतर दारूबंदी करणारा चंद्रपूर हा तिसरा जिल्हा होता. दारूबंदीच्या निर्णयाचे सर्वच स्तरावरून स्वागत झाले. तसेच काहींनी विरोधही केला. दारूबंदीमुळे जिल्ह्यात अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. यामुळे पोलिस प्रशासन आणि अबकारी विभाग घायकुतीला आला आहे. अवैध दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले असून, महिला वर्गांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 


अवैध दारूविक्रीवर तोडगा काढण्यासाठी वनिता राऊत यांनी अखिल भारतीय मानवता पक्षाकडून चिमूर मतदारसघांतून विधानसभेसाठी उमेदवारी दाखल केली. त्यांनी "गाव तेथे बिअरबार', "दारिद्य्ररेषेखालील कुटुंबाला सवलतीच्या दरात रेशन कार्डवर दारू', "कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचे व विक्रीचे आश्‍वासन' जाहीरनाम्यातून देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सर्वत्र त्यांच्याच जाहीरनाम्याची चर्चा होती. 24 तारखेला लागलेल्या निवडणुकीच्या निकालात सोशल मीडियावर "त्या दारूबाल्या बाईचे काय झाले' अशीच चर्चा होती. मात्र, मतदारांनी वनिता राऊत यांना फक्‍त 286 मत देत नाकारले. 

मतदारांना त्यांचे हित समजत नाही. मी कायदेशीर मार्गाने दारू पिण्याचे आश्‍वासन दिले होते. जे दारू पितात त्यांच्यासाठी हे आश्‍वासन होते. सर्वांनी दारू प्यावी मी असे म्हटले नाही. मात्र, नागरिकांना बेकायदेशीर मार्गानेच दारू प्यायची आहे. यापुढे चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात उमेदवारी दाखल करणार नाही. 
- वनिता राऊत, पराभूत उमेदवार 

चिमूर विधानसभा क्षेत्र, लोकसभा क्षेत्रात पुन्हा स्वतः किंवा पक्षाचा उमेदवार देणार नाही. तसेच शहर किंवा गावात शाखा उघडणार नाही. वनिता राऊत पराभूत झाल्या; मात्र अवैध दारूविक्रीचा प्रश्‍न उद्यापही अनुत्तरित आहे. 
- जितेंद्र राऊत, 
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मानवता पक्ष 


सोशल मीडिया जोक्‍स 
- बाकी सर्व ठीक आहे; पण "त्या दारूबाल्या बाईचे काय झाले' काही समजले काय? 
- अरे त्या बाईला तर 286 मते मिळाली, आता स्वस्त दारू कशी मिळणार.

- असे उमेदवार आमच्याकडे हवा होता. ज्यांना मिळतो ते फयदा घेत नाही रे बावा... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com