लग्न पत्रिकेमधून सामाजिक संदेश... 

Marriage
Marriage

आर्णी : विवाह सोहळा म्हटला की देवी देवतांच्या कृपाभिलाषेने संपन्न होत असतात. अगदी मुलगा मुलगी पहाणीची सुरवातच पंचागा पासुन होते. ती शुभ मुहुर्तावर संपते. देवी देवतांना साक्षीदार ठेवून लग्नाला येण्याचे निमंत्रण देण्यात येते. कुळदेवाच्या प्रसन्नतेने सुरू झालेली निमंत्रण पत्रिका चिमुकल्याच्या विनंतीने संपते परंतु या कोणत्याच गोष्टीचा उल्लेख नसलेली लग्न पत्रिका हातात पडते तेव्हा तीची तर चर्चा होणारच. अशीच एक लग्न पत्रिका तयार केली आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथिल मारोतराव रोडगे यांच्या गजानन च्या लग्नाची. 

गजाननने आपल्या विवाह निमंत्रणा च्या पत्रिकेमधुन आपल्या समाज बांधवासह मित्र परिवारांना सामाजिक बांधिलकीच नव्हे तर देशहित तथा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. चि. गजानन जनार्दन रोडगे रा अंजनखेड ता आर्णी यांचा विवाह चि. सौ. का. प्रतिभा सोमनाथ डोईफोडे रा भार्डी ता अबंड जि. जालना हिचे सोबत ता २६ मे १९ रोजी दुपारी ११.०५ मिनिटाने स्थळ डि. एड. कॉलेज भार्डी ता अंबड येथे होऊ घातला आहे. त्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी गजानन ने पत्रिकेमधुन सामाजिक दायित्व जोपासले आहे. 

यामध्ये सुरूवातीलाच शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,अहल्याबाई होळकर, महात्मा फुले, भगतसिंग, संत गाडगेबाबा, राष्टसंत तुकडोजी महाराज डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे फोटो नंतर सामाजिक संदेश देणारे वाक्य मुलगी मुलगा आहे समान, दोघेही उंचावेल देशाची मान !, वरूणराजा प्रसन्न, निसर्ग राजा प्रसन्न, बळीराजा प्रसन्न ही दैवत समजुन जह है तो कल है, पर्यावरण वाचवा, स्वच्छ भारत अभियान, एक कदम स्वच्छता की और, नेत्रदान श्रेष्ठदान, रक्तदान श्रेष्ठदान, जय जवान जय किसान, अक्षीदा (अन्न ) नको फुल टाकुन आम्हाला आशिर्वाद द्या, सर्व शिक्षा अभियान, सारे शिकुया, पुढे जाऊया, जाती पातीचे बंध तोडा, भारत जोडा भारत जोडा असा संदेश देऊन समाज परिवर्तनाचा प्रयत्न केलेला आहे. हि लग्न पत्रिका जरी वाटत असली तरी समाज परीवर्तनाची सुरूवात म्हनायला हरकत नाही. त्यामुळे या पत्रिकेची चांगलीच चर्चा तालुक्यात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com