प्रबोधनातून बहरतोय विज्ञानवादी वटवृक्ष

Social organizations are making efforts to spread the science
Social organizations are making efforts to spread the science

अकोला : विज्ञान ही ज्ञानाची व्यापक अशी शाखा आहे. मानवी समाजाच्या विकासात ज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात विज्ञाननिष्ठा निर्माण आणि व्यापक करण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असते. हे जाणून शहरातील जाणकारांनी विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराची मुहूर्तमेढ रोवली आहे. यातून समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरणारी अंधश्रद्धा, विज्ञानाबाबतचे अज्ञान, साक्षरता, आरोग्य जागृती या क्षेत्रात प्रबोधन करण्याचा वसा हाती घेतला. त्यातूनच विज्ञानवादी वटवृक्ष बहरत चालला आहे. शहरातील विज्ञान अध्यापक मंडळ, निशिका अभ्यास केंद्र, महाराष्ट्र अंधश्रध्दा समिती, विवेक वाहिनी अशा अनेक संस्थांनी विज्ञानाचा दिवा तेवता ठेवला आहे.

जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ -
जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ हे प्रत्येक तालुक्यातील विज्ञान अध्यापक मंडळाच्या माध्यमातून जिल्हाभरात विज्ञान विषयक उपक्रम राबविल्या जातात. यावर्षी विद्यार्थी विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्य महोत्सव जिल्ह्यात आयोजन करण्याकरिता जिल्हास्तरावर विद्यार्थी व शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात येते. या उपक्रमामध्ये विद्यार्थी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर असे सहभागी होतात. यावर्षी १५ हजार विद्यार्थ्यांची ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती -
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोन संघटना चांगल्याच परिचित आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन जागवून प्रबोधन, प्रत्यक्ष संघर्ष व कायदेशीर लढाई या सर्व पातळ्यांवर अंधश्रद्धांशी लढा देणे हे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. महाराष्ट्र अंनिस नजीकच्या भविष्यात आपल्या कार्यकक्षा रुंदावून विद्यार्थी व युवक यांना वैज्ञानिक पद्धतीचे प्रशिक्षण देणे व छद्म-विज्ञानाच्या मदतीने पसरविल्या जाणाऱ्या आधुनिक अंधश्रद्धांचा विरोध करणे, या दिशेनेही कार्य करत आहे.

निसर्ग अभ्यास केंद्र -
विद्यार्थ्यांना भौगोलिकमाहिती मिळावी, निसर्गाची ओढ लागावी व भौगोलिक संकल्पना स्पष्ट व्हाव्या या उद्देशाने गायगाव येथील निसर्ग अभ्यास केंद्राच्या माध्यमातून केंद्राचे संस्थापक प्रभाकर दोड यांनी पृथ्वीरील स्थळनिर्देशांक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्व, निसर्गाची किमया, धृवताऱ्याचे वैशिष्ट्य, अक्षांश व रेखांश याची माहिती तर देतातच यासोबतच भूगोल आणि खगोलासंबंधी वारंवार होणारे बदल सुर्यग्रहन, चंद्रग्रहण, ग्रहांची स्थिती यासारखी माहिती ते विद्यार्थ्यांना देतात. यासाठी त्यांनी निसर्ग अभ्यास केद्रात विविध प्रतिकृती बनविल्या आहेत.

विवेक वाहिनी -
आजचे विद्यार्थी हे उद्याच्या समाजाचे वेगवेगळे घटक आहेत. तेच उद्याच्या समाजाच्या जडणघडणीचे साक्षीदारही असतील. याकरिता शिवाजी महाविद्यालयात रोहन बुंदेले आणि विद्यार्थ्यांनी विवेक वाहिनीचा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्याला विवेकनिष्ठ बनविणे व विवेकनिष्ठ विद्यार्थ्यांकडून डोळस व विवेकशील समाज घडविण्यासाठी ही धडपड आहे. संत तुकोबांनी एका अभंगात ‘सत्य असत्याचे मन केले ग्वाही ‍‍। नाही मानिले बहुमता’ असे म्हटले आहे. तुकाराम महाराजांच्या या शिकवणुकीला जर फलद्रूप बनवाविन्याकरिता विवेक वाहिनीचा जागर सुरू करण्यात आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com